Shark Tank India Season 2 : ‘शार्क टँक इंडिया’ या कार्यक्रमाच्या दुसऱ्या सीझनची जबरदस्त चर्चा आहे. पहिल्या सीझनपैकी भारतपे कंपनीचा फाउंडर अशनीर ग्रोव्हर या दुसऱ्या सीझनमध्ये नसल्याने बऱ्याच लोकांना हा सीझन आवडणार नाही अशी चर्चा होती. पण हा नवा सीझनही प्रेक्षकांनी डोक्यावर घेतला आहे आणि देशातील वेगवेगळ्या उद्योजकांच्या भन्नाट बिझनेसमध्ये कार्यक्रमातील शार्क्स हे भरभरून गुंतवणूक करत आहेत.

सगळ्या शार्क्सनी मिळून या दुसऱ्या सीझनच्या ५ व्या आठडव्यापर्यंत ४२.९३ कोटी रुपये वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये गुंतवले आहेत. येत्या काही भागांमध्ये हे शार्क्स आणखी बरीच गुंतवणूक करतील अशी अपेक्षा आहे. अशातच या शोमध्ये नुकतंच एका व्यक्तीने शार्क्सकडे पैशांची नव्हे तर त्यांच्या वेळेची मागणी केली आणि त्याबदल्यात तो त्यांना स्वतःच्या कंपनीत भागीदारी द्यायला तयार झाला आहे.

आणखी वाचा : सोनाली कुलकर्णीचा बोल्ड आणि ग्लॅमरस अंदाज चर्चेत; नेटकरी खिल्ली उडवत म्हणाले “काकू जरा…”

शार्क टँक इंडियाच्या इतिहासात असं पहिल्यांदा घडत आहे की याठिकाणी येऊन बिझनेसची संकल्पना मांडणारी व्यक्ती शार्क्सकडे पैशांची मागणी करत नाही. गुरसौरभ सिंग या व्यक्तीने आपल्या रोजच्या सायकलला इलेक्ट्रिक सायकलमध्ये रूपांतरित करणाऱ्या एका किटचा शोध लावला आहे, आणि याच किटसाठी त्यांनी नुकतीच शार्क टँकच्या मंचावर हजेरी लावली आहे.

गुरसौरभ यांच्या या किटचं नाव आहे ध्रुव विद्युत आणि हे किट सायकलवर बसवल्याने तिचं एका इलेक्ट्रिक सायकलमध्ये रूपांतर होतं. मध्यंतरी एका सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर व्हायरल व्हिडिओमुळे या वस्तुबद्दल आधीपासूनच शार्क्सना माहीत असल्याचंही या भागात स्पष्ट झालं. तेव्हा आपल्या या किटसाठी गुरसौरभ यांनी चक्क शार्क्सकडे पैसे न मागता त्यांचे १०० तास ०.५% इक्विटिसाठी मागितले आहेत. हे ऐकून सगळेच शार्क आश्चर्यचकित झाले. आता नमिता, अनुपम, पियुष, विनीत आणि अमन यापैकी यामध्ये कोण गुंतवणूक करणार हे लवरच समोर येईल. हा कार्यक्रम तुम्ही सोनी टेलिव्हिजनवर सोमवार ते शुक्रवार रात्री ९ वाजता बघू शकता, तसेच सोनी लीव्ह या ओटीटी प्लॅटफॉर्मवरही याचे भाग उपलब्ध आहेत.

Story img Loader