छोट्या पडद्यावर मनोरंजनासाठी प्रेक्षकांकडे अनेक पर्याय आहेत. आज मालिका विश्वात रोज काहीतरी नवे घडत असते. प्रत्येक वाहिनी दर्जेदार मालिका प्रेक्षकांसाठी घेऊन येत असते. नुकतीच झी वाहिनीवर नवी मालिका सुरु झाली आहे. या मालिकेचे नाव आहे ‘हृदयी प्रीत जागते.’ विशेष म्हणजे या मालिकेचा नुकताचआज पर्यंत आपण चित्रपटाचे भव्य प्रीमियर होताना पाहिलेत. पण मालिका विश्वात प्रथमच इतका मोठा भव्य दिव्य प्रीमियर सोहोळ मालिकेच्या सेटवर खुल्या मैदानात हा प्रीमियर सोहळा पार पडला आहे.
या मालिकेत संगीतमय प्रेमकथा दाखवली गेली आहे. मालिकेतील नायिका एक निस्वार्थी, प्रामाणिक आणि आज्ञाधारक मुलगी आहे जी एका नम्र कुटुंबातील आहे. तर नायक प्रचंड हुशार, मोहक मुलगा आहे आणि त्याला पाश्चिमात्य संगीताची आवड आहे. नायिका कीर्तन गायिका आहे आणि त्यांच्या घरात कीर्तनाची परंपरा आहे. तर नायक रॉक बँड परफॉर्मर आहे. ही भिन्नता असूनसुद्धा दोघांचंही संगीतावर जीवापाड प्रेम आहे. आता हेच संगीत या दोन आत्म्यांना कसं एकत्र आणते हे बघणं प्रेक्षकांसाठी औत्सुक्याचं ठरणार आहे.
‘हर हर महादेव’वरुन वाद : “प्रेक्षकांना मारहाण करणं ही कुठली संस्कृती?”; मनसेचा आव्हाडांना सवाल
या मालिकेतून पहिल्यांदाच सिद्धार्थ खिरीद आणि पूजा कातुर्डे ही तरुण जोडी मुख्य भूमिकेत दिसणार आहे. यांच्याबरोबरीने पंकज विष्णू, राजन भिसे, पौर्णिमा तळवलकर यांसारखे दिग्गज कलाकार मालिकेत दिसणार आहेत. दिग्दर्शक मंदार देवस्थळी यांनी या मालिकेचं दिग्दर्शन केलं आहे. तर अभिजीत शेंडे यांनी लेखन केले आहे. या मालिकेची निर्मिती राजेश जोशी यांनी केली आहे.
७ नोव्हेंबरपासून ही मालिका सुरु झाली आहे. बऱ्याच दिवसांनी एखादी मालिका संगीत प्रेमकथेवर असल्याने प्रेक्षकदेखील यासाठी उत्सुक आहेत. अल्पवधीतच ही मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस पडणार हे नक्की.