महानायक अमिताभ बच्चन सध्या ‘कौन बनेगा करोडपती’ या कार्यक्रमाच्या चित्रीकरणामध्ये व्यग्र आहेत. २००० मध्ये सुरु झालेल्या या कार्यक्रमाशी ते पहिल्या पर्वापासून जोडले गेले होते. आता ते ‘केबीसी’ची ओळख बनले आहेत. या कार्यक्रमामध्ये ते सूत्रसंचालक म्हणून काम करतात. हा खेळ सुरु असताना ते समोर बसलेल्या स्पर्धकाला आपलंसं करतात. काही दिवसांपूर्वी या कार्यक्रमाच्या टीमसह मिळून बच्चन परिवाराने त्यांचा ८० वा वाढदिवस साजरा केला होता.

या शोमधल्या नव्या भागाचा प्रोमो नुकताच सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आला. यावेळी अमिताभ यांच्यासमोरील हॉटसीटवर डॉ. समित सेन बसले होते. २८ वर्षीय डॉ. सेन दिल्लीमधील राम मनोहर लोहिया महाविद्यालयामध्ये मायक्रोबायोलॉजी या विषयामध्ये मास्टर्स करत आहेत. ‘केबीसी’च्या २२ वर्षाच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा अंदमान-निकोबार बेटांवरुन येणारे ते पहिले स्पर्धक आहेत.

आणखी वाचा – दिवाळीच्या शुभेच्छा देत श्रेया घोषालने गायले ‘या’ सुपरहिट मराठी चित्रपटातील गाणे; व्हिडीओ व्हायरल

या व्हिडीओमध्ये अमिताभ बच्चन डॉ. सेन यांच्याशी गप्पा मारत असल्याचे पाहायला मिळते. त्यांनी “तुम्ही अंदमान-निकोबार बेटांचे प्रतिनिधित्व करणारे पहिले स्पर्धक आहेत”, असे म्हणत डॉ. सेन यांचा सत्कार केला. पुढे अमिताभ यांनी “याबद्दल आता तुम्हाला काय वाटत आहे?” असा सवाल केला. त्याचे उत्तर देताना डॉ. सेन म्हणाले, “ही माझ्या अत्यंत अभिमानास्पद गोष्ट आहे. आमच्याकडे पोर्ट ब्लेअरला सर्वजण तुमचा हा कार्यक्रम नेहमी पाहत असतात. मी लहानपणी तुम्ही आमच्या तिथे भेट दिल्याची अफवा ऐकली होती.” त्यावर बच्चन यांनी स्मितहास्य देत “हो. मी एकदा तेथे आलो होतो” असे म्हटले.

आणखी वाचा – नेटफ्लिक्सच्या ‘चेरापुंजी की दिवाली’ जाहिरातीवर नेटकरी संतापले; म्हणाले “आधी अभ्यास…”

सोनी टिव्ही वाहिनीच्या इन्स्टाग्राम हँडलवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. या व्हिडीओला “डॉ. समित सेनजी तुम्ही फक्त अंदमान आणि निकोबार बेटांची शानच नाही, तर त्यांची प्रेरणा आणि अभिमान देखील आहात”, असे कॅप्शन दिले आहे.

Story img Loader