राष्ट्रवादीच्या काही आमदारांसह अजित पवारांनी शिंदे-फडणवीस सरकारला पाठिंबा दिल्यामुळे काही दिवसांपूर्वी राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली. राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली असली, तरीही त्यांच्या भाजपामध्ये जाण्याच्या चर्चा कायम आहेत. महाराष्ट्रातील सध्याच्या राजकीय स्थितीवर आणि छत्रपती संभाजी महाराजांची कलाकृती करताना आलेल्या वैयक्तिक राजकीय अनुभवाबाबत अमोल कोल्हेंनी ‘खुपते तिथे गुप्ते’ या कार्यक्रमांत भाष्य केले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा : Video : शोएब इब्राहिमच्या मालिकेच्या सेटवर घुसला बिबट्या, कुत्र्यावर केला हल्ला; व्हिडीओ व्हायरल

खासदार डॉ. अमोल कोल्हे २३ जुलैला प्रदर्शित होणाऱ्या अवधूत गुप्ते यांच्या ‘खुपते तिथे गुप्ते’ या कार्यक्रमाला हजेरी लावणार आहेत. या भागाचा प्रोमो नुकताच प्रदर्शित करण्यात आला आहे. यावेळी अमोल कोल्हे यांनी छत्रपती संभाजी महाराजांवर कलाकृती करताना आलेल्या अनुभवाविषयी सांगितले. ते म्हणाले, “मला छत्रपती संभाजी महाराजांवर एक कलाकृती करायची होती. त्यावेळी मला एका तत्कालीन खासदाराने सांगितले ‘जर हा प्रकल्प फसला आणि याला प्रॉपर्टीसह विकला तरीही पैसे मिळणार नाहीत.’ मी त्यांच्याकडे आर्थिक गुंतवणुकीची मागणी करण्यासाठी गेलो होतो. ते आज माजी खासदार आहेत.”

हेही वाचा : “कमी पैशांत काम, गंभीर आजार, मासिक पाळीत त्रास अन्…”, बॉलीवूड अभिनेत्रीने शेअर केलेली पोस्ट चर्चेत

अमोल कोल्हे पुढे म्हणाले, “माझ्या डोळ्यासमोर आज सगळे चेहरे आहेत, ज्यांनी मला तेव्हा नकार कळवला होता. ज्या लोकांची दारं मी ठोठावून आलो ज्यांनी मला नकार दिला… जेव्हा तेच चेहरे महाराजांचे आणि संभाजी महाराजांचे नाव घेतात तेव्हा मनात खरंच कुठेतरी वाईट वाटतं”

हेही वाचा : Video: बिल्डिंगच्या गच्चीवर विराजस कुलकर्णी-शिवानी रांगोळेचा रोमँटिक अंदाज, अभिनेता म्हणाला, “पाऊस पडतोय आणि…”

दरम्यान, डॉ. अमोल कोल्हे ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ या मालिकेद्वारे घराघरांत पोहोचले. या मालिकेच्या निर्मितीसाठी त्यांनी आपले घर देखील विकले होते. ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ ही मालिका आज छोट्या पडद्यावरील सर्वाधिक लोकप्रिय मालिकांपैकी एक म्हणून ओळखली जाते. या मालिकेत अमोल कोल्हे यांनी संभाजी महाराजांची व्यक्तिरेखा साकारली आहे.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Former mp reject to finance chhatrapati sambhaji maharaj artwork amol kolhe shared experience in khupte tithe gupte sva 00
Show comments