Friendship Day : दरवर्षी ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या रविवारी फ्रेंडशिप डे साजरा केला जातो. त्याप्रमाणे आज ( ४ ऑगस्ट) सर्वत्र फ्रेंडशिप डे साजरा केला जात आहे. आपल्या खास मित्र-मैत्रिणींसाठी प्रत्येकजण काहींना काहीतरी करताना दिसत आहेत. कलाकार मंडळी देखील आपल्या खास मित्र-मैत्रिणींसाठी खास पोस्ट लिहित आहेत. ‘बिग बॉस मराठी’च्या पहिल्या पर्वाची विजेती मेघा धाडेने नुकतीच फ्रेंडशिप डे निमित्ताने खास पोस्ट लिहिली आहे. तिच्या या पोस्टने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘बिग बॉस मराठी’चं पहिलं पर्व चांगलंच गाजलं होतं. प्रसिद्ध दिग्दर्शक, लेखक, निर्माते आणि अभिनेते महेश मांजरेकर यांनी पहिल्या पर्वाचं सूत्रसंचालन केलं होतं. या पर्वात बरेच जण खास मित्र-मैत्रिणी झाले. यामध्ये मेघा धाडे, सई लोकूर, पुष्कर जोग या तिघांची मैत्री प्रेक्षकांना खूप आवडली. हे त्रिकुट ‘बिग बॉस मराठी’च्या अंतिम फेरीपर्यंत पोहोचलं होतं आणि अखेर मेघाने बाजी मारली. ‘बिग बॉस’च्या घराबाहेर काही काळासाठी हे त्रिकुट एकत्र पाहायला मिळालं. आज फ्रेंडशिप डे ( Friendship Day ) निमित्ताने मेघाने सई किंवा पुष्कर यांच्यासाठी नव्हे तर आपल्या खास दोन मैत्रिणींसाठी पोस्ट लिहिली आहे.

मेघा धाडे

हेही वाचा – अजय देवगण-तब्बूच्या ‘औरों में कहां दम था’ चित्रपटाची दुसऱ्या दिवशी जबरदस्त कमाई, ‘इतक्या’ कोटींचा जमवला गल्ला

मेघा धाडेच्या या खास मैत्रिणी दुसऱ्या-तिसऱ्या कोणी नसून अभिनेत्री शर्मिष्ठा राऊत आणि स्मिता गोंदकर आहे. शर्मिष्ठा आणि स्मिता देखील ‘बिग बॉस मराठी’च्या पहिल्या पर्वात झळकल्या होत्या. पण ‘बिग बॉस’मध्ये मेघा, शर्मिष्ठा आणि स्मिताची घट्ट मैत्री पाहायला मिळाली नाही. पण ‘बिग बॉस’च्या घराबाहेर या तिघींची चांगली मैत्री झाली. त्यामुळेच आज मेघाने फ्रेंडशिप डेनिमित्ताने ( Friendship Day ) शर्मिष्ठा आणि स्मितासाठी खास पोस्ट लिहिली आहे. तसंच तिने तिघींच्या फोटोंचा एक व्हिडीओ देखील शेअर केला आहे.

ही मैत्री एकमेकांसाठी खूप मोठा आधार – मेघा धाडे

मेघाने हा व्हिडीओ शेअर करत लिहिलं आहे, “‘बिग बॉस मराठी’च्या घरात मेघा सई आणि पुष्की हा ट्रायो सगळ्यांनाच माहिती होता. पण नंतर तयार झालेली ही एक गोड मैत्री तुम्हाला माहिती होती का? नाही ना, पण हो ती होती आणि ही मैत्री एकमेकांसाठी खूप मोठा आधार होती…शमा आणि स्मिता तुम्ही दोघी माझ्याबरोबर आहात यासाठी धन्यवाद. दोघींना खूप सारं प्रेम.” ( Friendship Day )

हेही वाचा – Bigg Boss Marathi : ‘भाऊचा धक्का’ गाण्याचा गायक, गीतकार अन् संगीतकार आहे ‘बिग बॉस’मध्ये झळकलेला ‘हा’ स्पर्धक, पोस्ट करत म्हणाला…

हेही वाचा – “तुमचं वय घरी ठेवून या…”, ‘ठरलं तर मग’ फेम अभिनेत्रीची ‘बिग बॉस’मधील वादावरून खोचक पोस्ट, म्हणाली, “मान अपमानाची अपेक्षा…”

दरम्यान, मेघा धाडेच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर, ती राजकारणात अधिक सक्रिय झाली आहे. गेल्या वर्षी जून महिन्यात मेघाने भाजपात प्रवेश केला होता. भाजपाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत तिनं भाजपाचा झेंडा हाती घेतला होता. त्यानंतर ऑगस्टमध्ये मेघाची महाराष्ट्र प्रदेश सहसंयोजक पदी नियुक्ती करण्यात आली. सध्या ती महाराष्ट्र प्रदेश भाजपा सांस्कृतिक प्रकोष्ठ उपाध्यक्ष आहे.राजकारणात सक्रिय झाली आहे.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Friendship day 2024 bigg boss marathi winner megha dhade shares special post for sharmishtha raut and smita gondkar pps