Gashmeer Mahajani on Bigg Boss 18: बिग बॉस हा टीव्हीवरील लोकप्रिय रिअॅलिटी शो आहे. सध्या या शोचे १८ वे पर्व सुरू आहे. या पर्वाच्या ग्रँड फिनालेला अवघे काही दिवस बाकी आहेत. जवळपास तीन महिन्यांच्या प्रवासात अनेक स्पर्धक घराबाहेर पडले. या शोमध्ये सध्या १० सदस्य असून यापैकी पाच सदस्य ग्रँड फिनालेमध्ये पोहोचतील. अभिनेता गश्मीर महाजनीला नुकताच बिग बॉसबद्दल प्रश्न विचारण्यात आला. उत्तर देताना त्याने या शोला थर्ड क्लास म्हटलं आहे.
बिग बॉसमधील स्पर्धक अभिनेता करणवीर मेहरा हा ‘खतरों के खिलाड़ी 14’ चा विजेता ठरला. या शोमध्ये त्याच्याबरोबर अभिनेता गश्मीर महाजनीदेखील होता. या शोमध्ये गश्मीर, करणवीर व टायगर श्रॉफची बहीण कृष्णा श्रॉफ हे टॉप तीन स्पर्धक होते. यापैकी करणवीर मेहराने हा शो जिंकला. या शोमध्ये करणवीर व गश्मीरचा चांगला बाँड दिसून आला. गश्मीरने करणवीरला सपोर्ट करणाऱ्या अनेक पोस्ट शेअर केल्या होत्या. पण आता मात्र गश्मीरने चाहत्याने विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर देताना शोवर टीका केली.
हेही वाचा – जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात OTT वर काय पाहायचं? वाचा दमदार कलाकृतींची यादी!
गश्मीर महाजनीने इन्स्टाग्रामवर ‘आस्क मी एनिथिंग’ सेशन ठेवलं होतं. यामध्ये एका चाहत्याने गश्मीरला विचारलं की ‘बिग बॉस १८ साठी तुमचा करणवीरला सपोर्ट आहे का?’ यावर गश्मीरने मराठी चित्रपटांचा उल्लेख केला. “अहो तुम्ही मराठी सिनेमा थिएटरला जाऊन बघता का, ते आधी सांगा! काय ते थर्ड क्लास बिग बॉस, काय त्याला सपोर्ट करता,” असं गश्मीरने चाहत्याला उत्तर देताना लिहिलं.
हेही वाचा – सुकन्या मोनेंच्या लेकीची कमाल! परदेशात ‘या’ विषयात मिळवली मास्टर्स डिग्री; जुलियावर होतोय कौतुकाचा वर्षाव
पाहा पोस्ट –
गश्मीरने चाहत्यांच्या प्रश्नांची उत्तरं देताना मराठी सिनेमे पाहण्यासाठी प्रेक्षक थिएटरमध्ये जात नाहीत याबद्दल नाराजी व्यक्त केली.
यापूर्वी गश्मीरने करणवीर मेहराचं इन्स्टाग्राम पोस्ट करून कौतुक केलं होतं. तसेच एका मुलाखतीतही बिग बॉस १८ साठी करणवीरला पाठिंबा दिला होता. करणने बिग बॉसमध्ये चांगला खेळ दाखवावा, असं गश्मीर म्हणाला होता.
बिग बॉस १८ बद्दल बोलायचे झाल्यास या आठवड्यात सारा अरफीन खान या शोमधून एविक्ट झाली. सध्या या शोमध्ये करणवीर मेहरा, शिल्पा शिरोडकर, चुम दरांग, श्रुतिका अर्जुन, ईशा सिंह, कशिश कपूर, अविनाश मिश्रा, विवियन डिसेना, चाहत पांडे, रजत दलाल हे सदस्य आहेत.