Bigg Boss Marathi: बिग बॉस मराठीच्या पाचव्या पर्वाच्या ग्रँड फिनालेला अवघा एक आठवडा बाकी आहे. हा शो खूपच रंजक वळणावर पोहोचला आहे. या आठवड्यात घरातील सर्वच ८ सदस्य नॉमिनेटेड होते. त्यापैकी आता चार सदस्य सुरक्षित झाले आहेत. आज भाऊच्या धक्क्यावर आलेल्या पाहुण्यांनी याची घोषणा केली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आज भाऊचा धक्कामध्ये होस्ट रितेश देशमुख नाही. डॉ. निलेश साबळेंनी आज होस्टिंगची धुरा सांभाळली. आजच्या भागात ‘फुलवंती’ चित्रपटाच्या प्रमोशनसाठी गश्मीर महाजनी व प्राजक्ता माळी आले होते. या दोघांनी घरातील सदस्यांबरोबर डान्स केला. त्यानंतर जाता जाता त्यांनी या आठवड्यात सुरक्षित झालेल्या दोन सदस्यांची नावं सांगितली. हे सदस्य सुरक्षित असले तरी फिनालेमध्ये पोहोचलेले नाहीत.

Bigg Boss मध्ये गैरहजर राहणाऱ्या रितेश देशमुखचा परदेशातील व्हिडीओ आला समोर! जिनिलीया म्हणते, “बाबाला २० दिवसांनी…”

सर्वात आधी सुरक्षित झालेले स्पर्धक

बिग बॉस मराठीतील सर्व स्पर्धक पंढरीनाथ कांबळे, अंकिता वालावलकर, अभिजीत सावंत, वर्षा उसगांवकर, धनंजय पोवार, निक्की तांबोळी, सूरज चव्हाण व जान्हवी नॉमिनेटेड होते. घरातून आज कोण एलिमिनेट होणार, याकडे प्रेक्षकांचे लक्ष लागले आहे. याच दरम्यान दोन स्पर्धक एका आठवड्यापुरते सुरक्षित झाले आहेत. ते दोन स्पर्धक म्हणजे निक्की तांबोळी व सूरज चव्हाण आहेत. प्राजक्ताने सूरजच्या नावाची घोषणा केली, तर गश्मीरने निक्कीच्या नावाची घोषणा केली.

Bigg Boss Marathi – “त्या सीझनमध्ये एकाही मुलाला सोडलं नाहीस”, राखी सावंतने केली निक्कीची बोलती बंद; म्हणाली, “आय लव्ह यू बोलून…”

नंतर सुरक्षित झालेले दोन सदस्य

बिग बॉसच्या घरात ‘पाणी’ चित्रपटाच्या प्रमोशनसाठी सुबोध भावे व आदिनाथ कोठारे आले. हे दोघे स्पर्धकांबरोबर एक टास्क खेळले. त्यानंतर त्यांनी सुरक्षित झालेल्या दोन स्पर्धकांची नावं घेतली. आदिनाथने वर्षा उसगांवकर सुरक्षित असल्याची घोषणा केली. तर सुबोध भावेने अभिजीत सावंतचे नाव घेतले.

Bigg Boss Marathi : निक्की तांबोळी सुरक्षित होताच अरबाज पटेलची प्रतिक्रिया, म्हणाला…

आता धनंजय पोवार आणि जान्हवी किल्लेकर हे सेफ झाले असून पंढरीनाथ कांबळे, अंकिता वालावलकर दोघांवर एलिमिनेशनची टांगती तलवार होती. या दोघांपैकी पंढरीनाथ कांबळेचा बिग बॉसच्या घरातील प्रवास आज संपला.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Gashmeer mahajani prajakta mali announced safe contestants names of bigg boss marathi 5 hrc