Shivangi Joshi Kushal Tandon: ‘बिग बॉस’ फेम लोकप्रिय अभिनेता कुशाल टंडनने प्रेमात असल्याची कबुली दिली आहे. तो व शिवांगी रिलेशनशिपमध्ये आहेत. ‘ये रिश्ता क्या कहलाता है’ या मालिकेत नायरा ही भूमिका साकारून अभिनेत्री शिवांगी जोशी लोकप्रिय झाली होती. मागील काही काळापासून शिवांगी व कुशाल यांच्या नात्याच्या चर्चा होत होत्या, अखेर कुशालनेच याबाबत मौन सोडलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

शिवांगीने कुशालबरोबर ‘बरसातें’ ही मालिका केली होती आणि त्यांची केमिस्ट्री प्रेक्षकांना खूप आवडली होती. कुशल टंडनने म्हटलंय की तो त्याची सहकलाकार शिवांगी जोशीला डेट करत आहे. दोघांचे एकत्र सुट्टी घालवतानाचे फोटो व्हायरल झाले होते. त्यामुळे यांच्या नात्याबद्दल चर्चा सुरू होत्या, आता एका मुलाखतीत कुशलने सांगितलं की तो या नात्यात हळूहळू पुढे जात आहे आणि लग्नाचाही विचार करत आहे.

सूरज चव्हाण सहानुभूतीमुळे बिग बॉस जिंकला, या टीकेवर निक्की तांबोळी म्हणाली, “मी ट्रॉफी उचलली असती तर…”

आई-वडिलांचा शोध संपला – कुशाल

टाइम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीत कुशाल शिवांगीचा उल्लेख करत म्हणाला की त्याच्यासाठी मुलगी शोधण्याचा त्याच्या पालकांचा शोध अखेर संपला आहे. “मी आता लग्न करत नाहीये, पण मी प्रेमात नक्कीच आहे. मी हे नातं हळूहळू पुढे नेत आहे,” असा खुलासा कुशालने केला. कुशालने सांगितलं की त्याने लग्न लवकर करावं अशी त्याच्या आईची इच्छा आहे. “माझ्या आईला माझे लग्न होताना पाहायचे आहे आणि तिला शक्य झालं तर ती माझं लग्न आजच लावेल. खरं तर केव्हाही काहीही होऊ शकतं. मात्र सगळ्यात चांगली गोष्ट म्हणजे माझ्यासाठी चांगली मुलगी शोधण्यासाठी माझ्या आई-वडिलांचा शोध आता संपला आहे,” असं कुशाल म्हणाला.

हेही वाचा – ‘झापूक झुपूक’ सूरज चव्हाण अन् गौतमी पाटीलची भेट, व्हिडीओ पाहून नेटकरी म्हणाले, “भावाने मार्केट जाम केलंय”

कुशाल टंडन व शिवांगी जोशी (फोटो – इन्स्टाग्राम)

कुशाल-शिवांगीने एकत्र केलं काम

शिवांगी आणि कुशाल ‘बरसातें’ ही मालिका करत असताना त्यांच्या अफेअरच्या बातम्या येऊ लागल्या. हा शो बंद झाला, पण तरीही अनेकदा कुशाल व शिवांगी एकत्र दिसायचे. २६ वर्षांची शिवांगी त्याच्यापेक्षा १३ वर्षांनी मोठ्या असलेल्या ३९ वर्षीय कुशाल टंडनशी लग्न करणार असल्याची बातमी आल्यावर तिने सुरुवातीला या अफवा असल्याचं म्हटलं होतं. मात्र आता कुशालने नात्यावर शिक्कामोर्तब केलं आहे.

हेही वाचा – बॉलीवूड अभिनेत्रीने खरेदी केलं आलिशान घर, पतीबरोबर केला गृहप्रवेश, पाहा घराची झलक

शिवांगी ‘ये रिश्ता क्या कहलाता है’मध्ये काम करत होती, तेव्हा तिचं नाव मोहसिन खानसोबत जोडलं गेलं होते. शिवांगी आणि मोहसिनने नात्याची कबुली दिली होती, पण नंतर दोघांचे ब्रेकअप झाले. शिवांगी आणि मोहसिनने ‘ये रिश्ता क्या कहलाता है’ मध्ये जवळपास सहा वर्षे काम केलं होतं. कुशालबद्दल बोलायचं झाल्यास तो एकेकाळी अभिनेत्री गौहर खानबरोबर रिलेशनशिपमध्ये होता, दोघांचे ब्रेकअप झाले नंतर गौहरने जैद दरबारशी २०२० मध्ये लग्न केलं.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Gauhar khan ex boyfriend kushal tandon confirms dating shivangi joshi hrc