‘बिग बॉस १६’ हा शो दिवसेंदिवस मनोरंजक होत चालला आहे. या रविवारी झालेल्या एलिमिनेशनमध्ये अभिनेता गौतम विग घरातून बाहेर पडला. गौतम हा घरातील स्ट्राँग स्पर्धक होता. शोचं प्रिमिअर होऊन सध्या दीड महिने झाले आहेत, तसेच फिनालेसाठी बराच वेळ आहे. पण आताच बिग बॉसच्या एका माजी स्पर्धकाने यंदाचं सीझन कोण जिंकणार, याबद्दल अंदाज वर्तवला आहे.
अभिनेत्री गौहर खान ही ‘बिग बॉस’ शोची चाहती आहे आणि ती सुरुवातीपासूनच हा सीझन फॉलो करत आहे. ती ‘बिग बॉस’च्या सातव्या पर्वाची विजेती होती. दरम्यान, तिने यंदाच्या पर्वाचा विजेता कोण असेल, याबद्दल सांगितलं आहे. गौहरच्या मते अंकित गुप्ता यंदाचा विजेता ठरेल. कारण अंकितला कोणीही कितीही प्रवृत्त केलं तरी तो त्यावर तो प्रतिक्रिया देत नाही आणि शांत राहतो. यावरूनच तो किती मजबूत आहे हे दिसून येतं आणि तो शो जिंकण्यासाठीच इथे आला आहे, असं लक्षात येतं.
हेही वाचा – Video : किरण माने घरातून बाहेर पडताच विकास सावंत बदलला? अपूर्वा नेमळेकरशी मैत्री अन्…; प्रेक्षकही संतापले
अंकितची मैत्रीण प्रियांका सर्वांच्याच वादातही मधे पडून बोलत असते, पण अंकित मात्र कायम शांत असतो. नको असलेले वाद तो ओढवून घेत नाही. तो फार कमी बोलतो. त्यामुळे होस्ट सलमान खानपासून ते स्पर्धकांपर्यंत सर्वांनी अंकित गुप्ताला शोमध्ये बोलायला लावण्यासाठी खूप प्रयत्न केले आहेत. पण तो मात्र त्याची शांतता टिकवून आहे. त्यामुळेच हळूहळू प्रेक्षकांनी त्याला पसंत करायला सुरुवात केली आहे. “अंकितने शांत राहून हा शो जिंकल्यास मज्जा येईल. तो खूप ओरिजनल आहे आणि त्यामुळे तो माझा आवडता स्पर्धक आहे,” असं ट्वीट गौहरने केलंय.
दरम्यान, बिग बॉसचा फिनाले यायला अजून बराच वेळ आहे. तोपर्यंत अंकित गुप्ता घरात टिकून राहील की नाही, याबद्दल खात्रीने सांगता येत नाही, पण तो हा शो जिंकू शकतो, असं गौहर खानला तरी नक्कीच वाटतंय.