प्रेक्षकांचा लाडका ‘फिल्टरपाड्याचा बच्चन’ अर्थात अभिनेता गौरव मोरे लवकरच एका नव्या चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्याची प्रमुख भूमिका असलेला ‘अल्याड पल्याड’ चित्रपट येत्या १४ जूनला प्रदर्शित होणार आहे. यादरम्यान गौरव मोरे आणि मराठी अभिनेत्री माधुरी पवार यांनी केलेला जबरदस्त डान्स सध्या सोशल मीडियावर चर्चेत आला आहे.

१९९८ मध्ये गोविंदाचा ‘बड़े मियाँ छोटे मियाँ’ चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. यामधील प्रत्येक गाण्याने प्रेक्षकांच्या मनात एक वेगळं स्थान निर्माण केलं होतं. चित्रपटातील “किसी डिस्को में जाए…” हे गाणं आजही तरुणाईमध्ये लोकप्रिय आहे. सामान्य माणसांपासून ते अगदी सेलिब्रिटींपर्यंत सर्वत्र या गाण्याची आताही क्रेझ आहे.

‘बड़े मियाँ छोटे मियाँ’ चित्रपटात गोंविदा आणि रवीना टंडन यांनी “किसी डिस्को में जाए…” या गाण्यावर त्याकाळी भन्नाट डान्स करून सर्वांचं लक्ष वेधून घेतलं होतं. यामध्ये त्यांच्याशिवाय अमिताभ बच्चन, अनुपम खेर, परेश रावल अशी तगडी स्टारकास्ट होती.

हेही वाचा : “आडनावावर, घरच्यांवर जाण्याची गरज नाही”, आस्ताद काळे ट्रोलिंगबद्दल स्पष्टच बोलला; म्हणाला, “सभ्य भाषेत…”

आता या लोकप्रिय गाण्यावर मराठमोळ्या गौरव मोरेने अभिनेत्री माधुरी पवारबरोबर जबरदस्त डान्स केला आहे. याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. अभिनेत्रीने या व्हिडीओला “आजूबाजूला निसर्गरम्य परिसर… त्यात डान्सवर प्रेम करणारी दोन माणसं आणि सुंदरसं गाणं” असं कॅप्शन दिलं आहे.

हेही वाचा : आजारपणानंतरही IPL च्या अंतिम सामन्याला उपस्थित राहणार शाहरुख खान! आर्यन-सुहानासह सगळेच मित्रमंडळी निघाले चेन्नईला

गौरव आणि माधुरीच्या या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे. “गौरव भावा मस्त रे नाद खुळा”, “माधुरी आणि गौरव तुम्ही दोघे पण छान आहात”, “भारी डान्स” अशा प्रतिक्रिया युजर्सनी या व्हिडीओवर दिल्या आहेत.

हेही वाचा : Video : नारकर जोडप्याला पडली मल्याळम भक्तिगीताची भुरळ, जबरदस्त हावभाव पाहून नेटकरी म्हणाले, “तुमचे रील्स…”

हेही वाचा : “वाढदिवसाच्या शुभेच्छा पप्पा…”, वडील विलासराव देशमुख यांच्या जयंतीनिमित्त रितेशने वाहिली आदरांजली

दरम्यान, ‘अल्याड पल्याड’ चित्रपटाबद्दल सांगायचं, झालं तर गौरव मोरे, सक्षम कुलकर्णी, सुरेश विश्वकर्मा, भाग्यम जैन, अनुष्का पिंपुटकर आदी कलाकारांच्या महत्त्वाच्या भूमिका या चित्रपटात आहेत. याशिवाय गौरवच्या कामाबद्दल सांगायचं झालं, तर त्याने नुकतीच ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ कार्यक्रमातून एक्झिट घेतली आहे. सध्या अभिनेता ‘मॅडनेस मचाएंगे’ या हिंदी कॉमेडी शोमध्ये प्रेक्षकांना खळखळून हसवत आहे.

Story img Loader