विशाल देवरुखकर दिग्दर्शित ‘बॉईज’ चित्रपटाचा पहिला भाग २०१७ मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. यानंतर २०१८ मध्ये दुसरा, २०२२ मध्ये तिसरा तर, गेल्यावर्षी २० ऑक्टोबरला ‘बॉईज ४’ चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला. विशाल देवरुखकर दिग्दर्शित ‘बॉईज ४’ चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगलं यश मिळवलं होतं. नुकतंच या चित्रपटाच्या टीमने रियुनियन केल्याचं पाहायला मिळालं. पण, ही भेट काहीशा हटके अंदाजात आहे.

‘बॉईज ४’ चित्रपटाची संपूर्ण टीम नुकतीच एकत्र फिरायला गेली होती. यावेळी या सगळ्या कलाकारांनी एकत्र मिळून कल्ला केल्याचं पाहायला मिळालं. एवढंच नाहीतर “निशाणा तुला दिसला ना…” हे जुनं गाणं सध्या सोशल मीडियावर ट्रेंड होत आहे आणि या गाण्यावर नेटकरी विशिष्ट अशा हूकस्टेप्स करत आहेत. या स्टेप्स जशाच्या तशा फॉलो करत ‘बॉईज ४’ चित्रपटाच्या टीमने स्विमिंग पूलमध्ये जबरदस्त डान्स केला.

Aai Kuthe Kay Karte Fame Kaumudi Walokar Sangeet Ceremony
Video : “कौमुदी या अखंड ताऱ्यांच्या…”, फिल्मी स्टाइल प्रपोज, जबरदस्त डान्स अन्…; मराठी अभिनेत्रीचा ‘असा’ पार पडला संगीत सोहळा
walmik karad illegal transportation
वाल्मीक कराड: राखेच्या अवैध वाहतुकीतून दहशतीचा धुरळा!
Bigg Boss Fame Marathi Actor Pushpa Style Dance
‘पुष्पा २’च्या ‘पीलिंग्स’ गाण्यावर मराठी अभिनेत्याचा जबरदस्त डान्स! सोबतीला आहे ‘ही’ अभिनेत्री, नेटकऱ्यांकडून कमेंट्सचा पाऊस
Marathi Actress Pooja Sawant Dance On radha song with Cousins watch video
Video: पूजा सावंतने भावाच्या संगीत सोहळ्यात धरला ठेका, भावंडांसह केला जबरदस्त डान्स
Actor Pankaj Tripathi statement about theatre Mumbai news
रंगभूमी हेच अभिनयाचे मूळ; अभिनेते पंकज त्रिपाठी यांचे ठाम प्रतिपादन
Navri Mile Hitlarla
Video: “मेरी दिल की…”, एजे-लीलाचा रोमँटिक अंदाज; प्रोमो पाहताच नेटकऱ्यांच्या मजेशीर प्रतिक्रिया, म्हणाले, “आमच्या भावनांशी…”
Kareena Kapoor At Taimur School Event
तैमूरला डान्स करताना पाहून भलतीच खूश झाली करीना कपूर! लेकाचा व्हिडीओ काढला अन् मध्येच उठून…; पाहा व्हिडीओ
Bigg Boss Marathi Season 5 Fame Yogita Chavan Dance video viral
Video: “बाई हा काय प्रकार”, ‘बिग बॉस मराठी’ फेम योगिता चव्हाणचा डान्स पाहून नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया, म्हणाले…

हेही वाचा : Video : गुजराती बांधणी साडीत खुललं नीता अंबानींचं सौंदर्य! लेकाच्या ‘मामेरु’ समारंभात ‘असं’ केलं पाहुण्याचं स्वागत

‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम अभिनेता निखिल बनेने याचा खास व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. यामध्ये हे सगळे कलाकार मिळून एकत्र डान्स करत असल्याचं पाहायला मिळत आहे. “‘बॉईज ४’च्या टीमबरोबर निशाणा…” असं कॅप्शन निखिलने हा व्हिडीओ शेअर करत दिलं आहे. यामध्ये पार्थ भालेराव, गौरव मोरे, सुमंत शिंदे यांची देखील झलक पाहायला मिळत आहे. ‘बॉईज’ चित्रपटाच्या टीमचं हे ऑफस्क्रीन बॉण्डिंग पाहून नेटकऱ्यांनी या व्हिडीओवर कौतुकाचा वर्षाव केला आहे.

निखिल बनेने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये एकूण १६ जण मिळून “निशाणा तुला दिसला ना…” या गाण्यावर थिरकले आहेत. गौरव मोरे या व्हिडीओमध्ये डाव्या कोपऱ्यात डान्स करत असल्याने सुरुवातीला काही नेटकऱ्यांना तो पटकन दिसला नाही. त्यामुळे या व्हिडीओवर काही जणांनी “गौरव सर खूप शोधावं लागलं” अशा प्रतिक्रिया दिल्या आहेत. तर, अन्य काही युजर्सनी निखिलच्या या व्हिडीओवर “क्या बात हैं…”, “तुम्ही किती भारी आहात राव”, “सगळ्यात भारी तो श्वान भाव खाऊन गेला” अशा कमेंट्स निखिल व गौरवचा हा डान्स व्हिडीओ पाहून केल्या आहेत.

हेही वाचा : ठरलं तर मग : पूर्णा आजीने सायलीचा केला स्वीकार! अखेर ‘तो’ भावनिक क्षण आलाच, नातसुनेवर सोपवली मोठी जबाबदारी

nikhil bane
निखिल बनेच्या व्हिडीओवरील कमेंट्स

दरम्यान, गौरव मोरे आणि निखिल बनेचे चाहते त्यांना भविष्यात विविध भूमिकांमध्ये पाहण्यासाठी उत्सुक आहेत. निखिल सध्या ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मधून प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. तर, गौरव मोरेने काही दिवसांपूर्वीच या शोमधून प्रेक्षकांचा निरोप घेतला. नुकताच त्याचा ‘अल्याड पल्याड’ चित्रपट प्रदर्शित झाला असून याला प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला आहे.

Story img Loader