‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ कार्यक्रमाच्या प्रेक्षक अगदी प्रेमात आहेत. तसेच या कार्यक्रमात काम करणाऱ्या विनोदी कलाकारांचेही लाखो चाहते आहेत. आता रणवीर सिंगही ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’चा फॅन झाला आहे. ‘सर्कस’ चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान रणवीर सिंगने या कार्यक्रमामध्ये हजेरी लावली होती. यादरम्यान त्याने ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’च्या कलाकारांचे तोंडभरून कौतुक केलं.
‘फिल्टर पाड्याचा बच्चन’ म्हणजे अभिनेता गौरव मोरेने रणवीरबरोबरचा एक व्हिडीओ सोशल मीडिया अकाऊंटद्वारे शेअर केला आहे. गौरवचा रणवीरबरोबरचा व्हिडीओ पाहून चाहते त्याचं कौतुक करत आहेत. तसेच रणवीरही त्याच्याशी बोलताना दिसत आहे.
पाहा व्हिडीओ
रणवीर गौरवचा हात मिळवतो, त्याला मिठी मारतो तसेच त्याच्याशी मनसोक्त गप्पा मारताना या व्हिडीओमध्ये दिसत आहे. तर गौरवही रणवीरचं त्याच्याबरोबर असलेलं वागणं पाहून खूश होतो. गौरव तर रणवीरला फ्लाइंग किसही देतो.
आणखी वाचा – Video : दीपिका पदुकोणनंतर सनी लिओनीने परिधान केले भगव्या रंगाचे कपडे, समुद्रकिनारी वाळूत लोळली अन्…
गौरव मोरे ग्रेट भेट, अशीच प्रगती करत राहा, आम्हाला तुझा अभिमान आहे. अशा अनेक कमेंट नेटकऱ्यांनी गौरवचा हा व्हिडीओ पाहून केल्या आहेत. रणवीरच्या साधेपणाचंही नेटकरी कौतुक करत आहेत. तसेच गौरवनेही त्याला वेळ दिल्याबाबत रणवीर सिंगचे आभार मानले आहेत.