‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या विनोदी कार्यक्रमाचे चाहते आज महाराष्ट्रातच नव्हे तर समस्त जगभरात आहेत. या कार्यक्रमामुळे अनेक नवोदित कलाकार प्रसिद्धीझोतात आले. अभिनेता गौरव मोरेला हास्यजत्रेमुळे घराघरांत एक वेगळी ओळख मिळाली. विनोदाचं अचूक टायमिंग साधत त्याने हजारो प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं आहे. सुरुवातीच्या काळात प्रचंड कष्ट आणि मेहनत करून गौरवने आज हे मोठं यश मिळवलं आहे. मात्र, आता गौरवने वैयक्तिक आयुष्यात एक मोठा निर्णय घेतला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

गेल्या काही दिवसांपासून गौरव मोरे हास्यजत्रेत झळकत नव्हता. त्यामुळे शोचे असंख्य चाहते या फिल्टरपाड्याच्या बच्चनला हास्यजत्रेचे एपिसोड पाहताना मिस करत होते. अखेर इन्स्टाग्राम पोस्ट शेअर करत गौरवने हास्यजत्रा सोडल्याचं जाहीर केलं आहे.

हेही वाचा : ठरलं तर मग : अखेर तो क्षण आलाच! सायली कुसुमसमोर देणार प्रेमाची कबुली पण, निर्माण होणार मोठा गैरसमज…

गौरव मोरेने सोडली ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’

नमस्कार! मी गौरव मोरे फ्रॉम पवई फिल्टरपाडा…
Ta na na na na naaaaaa

आरा बाप मारतो का काय मी….ये बच्ची……
रसिक प्रेक्षक आपण या साध्या मुलाला खूप प्रेम दिलं. नाव दिलं, सन्मान दिलात त्याबद्दल मी आणि माझा परिवार आपले कायम ऋणी आहोत…मला सांगताना खूप वाईट वाटतंय की, मी गौरव मोरे आपल्या लाडक्या मालिकेतून म्हणजेच ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मधून आपला निरोप घेत आहे. माझ्या कामातून कोणाच्या भावना दुखावल्या गेल्या असतील तर, मी त्या सगळ्यांची मनापासून माफी मागतो.

‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ सोडून अगदीच काही दिवस झाले आणि नवा शो घेऊन तुमच्या भेटीला आलो.. माध्यमसारखं राहिलं आणि तुमचं प्रेम देखील! असं म्हणतात ना… नव्या प्रवासाची गोष्ट और असते आणि म्हणूनच नव्या प्रवासात नव्या शोसाठी तुमचा खंबीर पाठिंबा कायम असावा. नवा प्रवास सुरू झाला आणि यातून देखील तुमच्यासारख्या रसिक प्रेक्षकांचं खळखळून मनोरंजन करणार आहे. म्हणून तुमचा आशीर्वाद आणि शुभेच्छा प्रेम असंच राहू दे!

हेही वाचा : मराठमोळी ऋतुजा बागवे झळकणार हिंदी मालिकेत! ‘बिग बॉस’ फेम अभिनेत्याबरोबर साकारणार भूमिका, म्हणाली…

दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून गौरव मोरे हिंदी कॉमेडी शो ‘मॅडनेस मचाएंगे’मधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यामध्ये त्याच्यासह कुशल बद्रिके, हेमांगी कवी हे मराठी कलाकार सुद्धा झळकत आहेत. याशिवाय आता लवकरच गौरव मोरे ‘महापरिनिर्वाण’ चित्रपटात महत्त्वाची भूमिका साकारणार आहे.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Gaurav more exit from maharashtrachi hasya jatra show shared emotional post sva 00