अभिनेता गौरव मोरे त्याच्या विनोदी कौशल्याने घराघरांत पोहोचला. ‘बाळकडू’, ‘संजू’, ‘विकी वेलिंगकर’, ‘बॉईज ४’ अशा चित्रपटांमध्ये वेगवेगळ्या भूमिका साकारत गौरवनं वेळोवेळी स्वत:ला सिद्ध केलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

फिल्टरपाड्याचा बच्चन, अशी ओळख असणाऱ्या या अभिनेत्यानं महाराष्ट्राची हास्यजत्रा या कॉमेडी शोमधून प्रेक्षकांची मनं जिंकली. गौरवनं नुकताच या लोकप्रिय शोचा निरोप घेतला. त्याबाबत त्यानं त्याच्या सोशल मीडियावर हास्यजत्रा या शोच्या सेटचा व्हिडीओ शेअर करीत आपल्या भावना व्यक्त केल्या होत्या.

हेही वाचा… हॉलीवूड कलाकारानंतर आता बॉलीवूड स्टार हृतिक रोशनने केली अ‍ॅपलच्या ‘त्या’ जाहिरातीवर टीका; अभिनेता म्हणाला…

गौरव सोशल मीडियवर नेहमी सक्रिय असतो. अभिनयासह आपल्या वैयक्तिक आयुष्यातल्या गोष्टीही तो चाहत्यांबरोबर शेअर करीत असतो. आता गौरवनं त्याच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर त्याच्या बालपणीचा फोटो शेअर केला आहे. सफेद शर्ट परिधान केलेला पासपोर्ट साईज फोटो त्यानं स्टोरीवर शेअर केला आणि कॅप्शन देत लिहिलं, “काही जुन्या आठवणी (कुछ पुरानी यादे).”

गौरवचा हा पासपोर्ट साईज फोटो त्याच्या शाळेतल्या काळातील आहे, असं दिसून येतंय. गौरवनं अनेकदा त्याच्या शाळेतल्या आठवणी मुलाखतींमधून सांगितल्या आहेत. त्याचीच आठवण ताजी करीत आज गौरवनं बालपणीचा फोटो शेअर केला आहे, असं दिसतंय.

हेही वाचा… ‘बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो

याआधी गौरवनं त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर त्याचे मित्र राकेश शालीन व शशिकांत गंगावणे यांच्याबरोबरचा फोटो शेअर केला होता. “तू कल चला जायेगा” हे गाणं त्यानं या फोटोला जोडलं होतं.

हेही वाचा… ठरलं तर मग: “सरांच्या मनात माझ्याविषयी प्रेम…”, अर्जुनच्या प्रेमात पडलेली सायली होणार कुसुमसमोर व्यक्त; प्रोमो पाहून चाहते म्हणाले, “फालतूगिरी…”

महाराष्ट्राची हास्यजत्रा सोडल्यानंतर गौरव मोरे सध्या ‘मॅडनेस मचायेंगे’ शोमधून प्रेक्षकांचं मनोरंजन करतोय. त्यामध्ये त्याच्यासह कुशल बद्रिके, हेमांगी कवी हे मराठी कलाकारदेखील आहेत. गौरवनं ‘मॅडनेस मचायेंगे’ या शोमध्ये एन्ट्री केल्यापासून त्याच्या वेगवेगळ्या लूक्सची चर्चा सोशल मीडियावर होत होती. कधी ‘भूलभुलैया‘मधला छोटा पंडित, तर कधी ‘बाहुबली‘मधला कालकेय अशा त्याच्या अनोख्या लूक्सनी प्रेक्षकांना आश्चर्यचकित केलं. त्याचे हे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले होते.

दरम्यान, गौरवच्या कामाबद्दल सांगायचं झालं, तर गौरवनं हिंदी कॉमेडी शो ‘मॅडनेस मचायेंगे’मध्ये आता एन्ट्री केली आहे. मराठीनंतर आता हिंदी कॉमेडी शोमधून गौरव प्रेक्षकांचं मनोरंजन करतोय. गौरवचा आगामी चित्रपट ‘महापरिनिर्वाण’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात गौरव महत्त्वाची भूमिका साकारणार आहे.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Gaurav more shared childhood photo on social media dvr