टीव्हीवरील लोकप्रिय जोडपे गौतम रोडे आणि अभिनेत्री पंखुरी अवस्थी लवकरच पालक होणार आहेत. ते त्यांच्या पहिल्या बाळासाठी खूप उत्सुक आहेत. लग्नाच्या पाच वर्षानंतर दोघेही आपल्या पहिल्यांदाच पालक होणार आहेत. सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करून या जोडप्याने गुडन्यू दिली होती, ज्यामध्ये ‘सरस्वतीचंद्र फेम अभिनेत्याची पत्नी बेबी बंप फ्लाँट करताना दिसत होती. अशा परिस्थितीत आता पंखुरीने खुलासा केला आहे की तिला लग्नाच्या दोन वर्षांनीच आई व्हायचे होते पण पीसीओडी म्हणजेच पाळीच्या अनियमिततेमुळे ती होऊ शकली नाही.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

Video: “तुला लाज वाटत नाही का?” विचित्र ड्रेस घातलेल्या जान्हवी कपूरला नेटकऱ्यांनी सुनावलं, भारतीय संस्कृतीची करून दिली आठवण

टीव्ही सीरियल ‘रझिया सुलतान’ फेम अभिनेत्री पंखुरी अवस्थीने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत प्रेग्नेंसीशी संबंधित गोष्टी शेअर केल्या आहेत. “PCOD हा माझ्या गरोदरपणात अडथळा ठरला होता. त्यामुळे माझी मासिक पाळी अनियमित येत होती. शेवटी मी सर्व काही देवावर सोडले आणि पालकत्वाचा विचार करणे सोडून दिलं होतं. पण आता जेव्हा मी प्रेग्नेन्सी टेस्ट केली आणि ती पॉझिटिव्ह आली, तेव्हा आम्हा दोघांचाही आनंद गगनात मावत नव्हता,” असं पंखुरी म्हणाली.

अभिनेता गौतम रोडेही त्याच्या पहिल्या बाळासाठी खूप उत्सुक आहे.त्याने आपला दिनक्रमही बदलला आहे. गौतमने सांगितलं की, तो पिता होण्यासाठी खूप उत्सुक आहे. तसेच थोडा घाबरलाही आहे. तो रात्रभर झोपू शकणार नाही, असं त्याला सगळेच सांगत आहेत. पण तो स्वतःलाच घुबड म्हणतोय, कारण तो रात्री वर्कआउट करतोय. पंखुरी दिवसा स्वतःची आणि बाळाची काळजी घेऊ शकते आणि मी रात्री तिची आणि मुलाची काळजी घेईन, असं गौतमने सांगितलं. आपल्या पहिल्या बाळाच्या जन्माची गौतम व पंखुरी आतुरतेने वाट पाहत आहेत. पंखुरी ६ महिन्यांची गर्भवती आहे.

Video: ऐश्वर्या राय-अभिषेक बच्चन घटस्फोट घेणार? सलमान खानबरोबरच्या ‘त्या’ व्हायरल व्हिडीओमुळे चर्चांना उधाण

पंखुरी आणि गौतम रोडे दोघेही अभिनय क्षेत्रात कार्यरत आहेत आणि त्यांचे टीव्ही जगतात खूप नाव आहे. त्यांची पहिली भेट ‘सूर्यपुत्र कर्ण’ या टीव्ही मालिकेच्या सेटवर झाली. त्यांच्यामध्ये १४ वर्षांचे अंतर आहे. शूटिंगदरम्यान दोघांमध्ये मैत्री झाली आणि लवकरच त्यांच्या मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. ५ फेब्रुवारी २०१८ रोजी दोघांचे लग्न झाले. आता पाच वर्षांनंतर ते पालक होणार आहेत.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Gautam rode and pankhuri awasthy shares pcod complications in pregnancy hrc