मृण्मयी देशपांडे आणि गौतमी देशपांडे ही मराठी मनोरंजन सृष्टीतील बहीणींची लोकप्रिय जोडी. आपल्या मोठ्या बहिणीच्या पावलावर पाऊल टाकत गौतमीनेही कलाविश्वात तिचं स्वतःचं स्थान निर्माण केलं आहे. त्यांच्या कामाबरोबरच त्या दोघी त्यांच्यातल्या बॉंडिंगमुळे सर्वांचं लक्ष वेधून घेत असतात. मृण्मयी आणि गौतमी दोघी बहिणींमध्ये त्यांच्या नात्यापलीकडची मैत्री पाहायला मिळते. आता त्यांचा एक व्हिडीओ सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.
गौतमी आणि मृण्मयी कायम एकमेकींचे गमतीशीर व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत असतात. आता नुकताच त्यांनी सोशल मीडियावर सुरू असलेल्या ट्रेण्डचा व्हिडीओ बनवला आहे. घरातच त्यांनी हा व्हिडीओ शूट केल्याचं दिसत आहे. या व्हिडीओमध्ये मृण्मयी आणि गौतमी दोघीही समोरासमोर उभे राहून डान्स करताना दिसत आहेत.
आणखी वाचा : राणादा-पाठक बाईंपाठोपाठ ‘या’ लोकप्रिय अभिनेत्रीने गुपचूप उरकले लग्न, म्हणाली…
या व्हिडीओतून त्यांनी भावंडांमधील खास मंत्र सांगितला आहे. या व्हिडीओत गौतमीच्या डोक्यावर लिहिलं आहे, “मला त्रास देणं बंद कर, मी तुझ्याशी नीट वागेन” असं लिहिलं आहे. तर तिच्यासमोर उभ्या असलेल्या मृण्मयीच्या डोक्यावर लिहिलं आहे, “तू माझ्याशी नीट वाग, मी त्रास देणं बंद करेन.” त्यांच्या या व्हिडीओने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे.
हेही वाचा : “तुम्ही ज्या सईवर ही प्रेम करता ती चोर आहे”… कपडे लपवल्याने गौतमीवर बहीण मृण्मयी देशपांडे चिडली
त्यांच्या या व्हिडीओवर लाईक्स आणि कमेंट्सचा तूफान वर्षाव होत आहे. त्यांच्या चाहत्यांनी तसंच मनोरंजन सृष्टीतील अनेक कलाकारांनी कमेंट्स करत त्यांचा हा व्हिडीओ आवडल्याचं सांगितलं आहे.