सध्या लग्नाचा हंगाम सुरू आहे. त्यामुळे कलाकार मंडळी लग्नबंधनात अडकून आयुष्याच्या नव्या प्रवासाला सुरुवात करताना दिसत आहे. काल, अभिनेत्री गौतमी देशपांडे हिने थेट मेहंदी सोहळ्याचे फोटो शेअर करून प्रेमाची कबुली दिली. अभिनेता स्वानंद तेंडुलकरबरोबर लवकरच ती लग्नबंधनात अडकणार आहे. आज गौतमी आणि स्वानंदला हळद लागली असून हळदीच्या सोहळ्यातील फोटो समोर आले आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

गौतमी देशपांडे आणि स्वानंद तेंडुलकरच्या हळदी सोहळ्यातील फोटो अभिनेता सारंग साठेसह त्याची पत्नी पॉलाने सोशल मीडियावर शेअर केले आहेत. “कुंकू हसलं, हळद पण हसली” असं लिहित सारंगने इन्स्टाग्राम स्टोरीवर हळदीचे फोटो शेअर केले आहेत. ज्यामध्ये गौतमी-स्वानंद पिवळ्या रंगाच्या पोशाखात दिसत आहेत.

हेही वाचा – Video: गौतमी देशपांडेच्या मेहंदी सोहळ्यात बहीण मृण्मयीचा जबरदस्त डान्स, पाहा खास क्षण

तसेच “भाई, भाई, भाई” लिहित सारंगची पत्नी पॉलाने स्वानंदचा हळदीचा लूक शेअर केला आहे. शिवाय तिने गौतमी-स्वानंदच्या जंगी हळदीचा व्हिडीओ देखील इन्टाग्राम स्टोरीला पोस्ट केला आहे.

दरम्यान, गौतमीचं स्वानंदबरोबर अफेअर असल्याची चर्चा एका फोटोमध्ये रंगली होती. पण यावर दोघांनी अजिबात भाष्य केलं नाही. त्यानंतर गौतमीची बहीण मृण्मयी देशपांडे सतत तिच्या पोस्टमधून लग्नाची हिंट देत होती. त्यामुळे चाहत्यांसह सर्वांनाच गौतमी लवकरच लग्नबंधनात अडकणार याची शंका होती. अखेर ती शंका काल खरी ठरली. गौतमीने  “यंदा सिक्रेट सांताचं आगमन लवकर झालंय…नवी सुरुवात” असं लिहित मेहंदी सोहळ्याचे फोटो शेअर केले. तसेच  #SwaG #lafdi असे कॅप्शनमध्ये हॅशटॅग लिहिले.

गौतमी देशपांडेचा होणारा नवरा काय करतो?

मराठीमधलं पहिलं डिजिटल चॅनेल ‘भाडिपा’चा बिझनेस हेड गौतमीचा होणारा नवरा स्वानंद तेंडुलकर आहे. त्याचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. २५ डिसेंबर गौतमी स्वानंदबरोबर लग्नगाठ बांधून आयुष्याच्या नव्या प्रवासाला सुरुवात करणार आहे.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Gautami deshpande and swanand tendulkar haldi ceremony photos viral pps