गौतमी देशपांडे व स्वानंद तेंडुलकर ही लोकप्रिय जोडी डिसेंबर महिन्याच्या अखेरीस विवाहबंधनात अडकली. सोशल मीडियावर मेहंदी सोहळ्याचे फोटो शेअर करून या जोडप्याने प्रेमाची जाहीर कबुली दिली होती. खऱ्या आयुष्यात स्वानंद-गौतमी २०२० पासून एकमेकांबरोबर होते. परंतु, एवढी वर्षे दोघांनीही या नात्याबाबत अधिकृतपणे कुठेही भाष्य केलं नव्हतं. लग्नानंतर दोघांनीही राजश्री मराठीच्या मुलाखतीत पहिल्यांदाच त्यांच्या लव्हस्टोरीबद्दल सांगितलं.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

गौतमी लव्हस्टोरीबद्दल सांगताना म्हणाली, “आमची ओळख इन्स्टाग्रामवर झाली. सारंगच्या एका पोस्टमध्ये मी याला पाहिलं होतं. बघताक्षणी मला असं वाटलं की, अरे किती गोड मुलगा आहे आणि मला त्याचं हसणं खूप आवडतं. मला मनापासून, मनमोकळेपणाने हसणारे लोक नेहमीच आवडतात. सारंगची पोस्ट पाहून मी त्याला फॉलो केलं. त्यानंतर याने मला फॉलोबॅक केलं. मधल्या काळात आम्ही एकमेकांशी काहीच बोललो नव्हतो. हळुहळू इन्स्टाग्रामवर आमचं बोलणं होऊ लागलं, तेव्हाच लॉकडाऊन सुरू होतं. सगळं सुरळीत झाल्यावर आम्ही एकमेकांना भेटायचं ठरवलं.”

हेही वाचा : अक्षरासमोर येणार भुवनेश्वरीचा भूतकाळ; चारुहास सुनेला सांगणार सत्य? ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ मालिकेत मोठा ट्विस्ट

स्वानंद याविषयी म्हणाला, “माझं बालपण चारकोपच्या चाळीत गेलंय. त्यामुळे मी रॅप वगैरे ऐकणारा मुलगा आणि ही एकदम क्लासिकल संगीत ऐकणारी मुलगी आहे. तिला डेटवर जाणं ही संकल्पना माहीतच नव्हती. त्यामुळे सुरुवातीला तिने डेटवर जायला नकार दिला होता. मग मी तिला नीट समजावलं. पुढे, आमची पहिली भेट झाली तेव्हा मी दोन-तीन अशा गोष्टी केल्या की, तिला त्या अजिबात आवडल्या नाहीत. तरीही आमचं बोलणं सुरु होतं. पहिल्या डेटनंतर काही आठवड्यांनी मी तिच्यासमोर मनातल्या भावना व्यक्त केल्या. तेव्हा तिने नाही उत्तर दिलं. मग मी म्हटलं ओके. पुढे, मी काहीच ट्राय नाही केलं. फक्त आपण आता बोलूया नको असं मी सांगितलं. त्यावर गौतमीचं म्हणणं होतं नाही…मला तुझ्याशी बोलायचंय. या सगळ्या गोष्टीतून मार्ग काढण्यासाठी मी तिला सोलो ट्रिपला जाऊन ये असा पर्याय सुचवला. सात दिवस ती हिमाचल प्रदेशला जाऊन आली आणि ते सात दिवस आम्ही २४ तास फोनवर बोलत होतो. ती परत आल्यावर थोडी रडारडी झाली…नाही राहू शकत वगैरै आणि आम्ही एकमेकांना डेट करायला सुरुवात केली.”

हेही वाचा : जाऊ बाई गावात : आजारपणानंतर सागर कारंडेचं कमबॅक! पोस्टमन काकांना पाहून स्पर्धक भावुक, व्हिडीओ व्हायरल

गौतमी पुढे म्हणाली, “स्वानंदला मी जेव्हा भेटले तेव्हा माझ्या आयुष्यात खूप वेगळा काळ सुरू होता. तेव्हा मी मानसिक तणावात होते. माझ्या आयुष्यात एवढ्या सगळ्या गोष्टी सुरू असताना सुद्धा तो कायम बरोबर होता. त्याने मला खूप चांगली साथ दिली. स्वानंद खूप जास्त प्रेमळ आणि मुळात खूप जास्त प्रेम करणारा आहे. अशाप्रकारे सगळ्या गोष्टी जुळून आल्या.”

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Gautami deshpande and swanand tendulkar love story and dating phase before marriage know in details sva 00