अभिनेत्री गौतमी देशपांडेचा समारंभपूर्वक लग्नसोहळा पाहायला मिळत आहे. लवकरच ती अभिनेता स्वानंद तेंडुलकरबरोबर लग्नगाठ बांधून आयुष्याच्या नव्या प्रवासाला सुरुवात करणार आहे. नुकताच तिचा मेहंदी, हळद आणि संगीताचा सोहळा मोठ्या दिमाखात पार पडला. याचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘माझा होशील ना’ या मालिकेतून घराघरात पोहोचलेल्या गौतमीच्या अफेअरची चर्चा गेल्या कित्येक महिन्यांपासून रंगली होती. स्वानंद तेंडुलकरबरोबर तिचं अफेअर असल्याची शंका अनेकांना आली होती. पण याबाबत गौतमीसह तिची बहीण मृण्मयी देशपांडेने मौन पाळलं होतं. अखेर २३ डिसेंबरला ही शंका खरी ठरली. गौतमीने “यंदा सिक्रेट सांताचं आगमन लवकर झालंय…नवी सुरुवात” असं लिहित थेट मेहंदी सोहळ्याचे फोटो शेअर केले. काल गौतमी-स्वानंदची जंगी हळद झाली. यासाठी गौतमी-स्वानंदने पिवळ्या रंगाचे मॅचिंग कपडे परिधान केले होते. काल सकाळी हळदीचा सोहळा पार पडल्यानंतर काल रात्री संगीत सोहळा झाला. याचे फोटो आणि व्हिडीओ समोर आले आहेत.

हेही वाचा – सविता मालपेकर यांना एका लोकप्रिय मालिकेदरम्यान दिला होता चॅनेल हेडने त्रास, प्रसंग सांगत म्हणाल्या, “अंतर्वस्त्र…”

गौतमीच्या संगीत सोहळ्यातील फोटो, व्हिडीओ मृण्मयीसह अनेक कलाकार मंडळींनी सोशल मीडियावर शेअर केले आहेत. मृण्मयीने शेअर केलेल्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये गौतमी होणारा नवरा स्वानंदबरोबर रोमँटिक डान्स करताना दिसत आहे. याचा व्हिडीओ ‘सिने अपडेट्स’ या इन्स्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आला आहे. या संगीत सोहळ्यात गौतमीची आई खास गाणं गाताना दिसली. ‘आओ हुजूर तुमको’ हे गाणं गौतमीच्या आईने गायलं.

हेही वाचा – Video: स्वानंदी टिकेकरच्या मेहंदी सोहळ्यात आई-वडिलांचा धमाल डान्स, व्हिडीओ व्हायरल

संगीत सोहळ्यासाठी गौतमी-स्वानंदने खास लूक केला होता. गौतमी पांढऱ्या रंगाच्या फ्रॉक स्टाईल ऑफ शोल्डर ड्रेसमध्ये दिसली. तर स्वानंदने पांढऱ्या रंगाच्या शर्टवर राखाडी रंगाचं जॅकेट घातलं होतं. आज गौतमी-स्वानंद लग्नबंधनात अडकणार आहेत. मोठा थाटामाटात हा लग्नसोहळा होणार आहे.

हेही वाचा – हळद लागली…! गौतमी देशपांडे आणि स्वानंद तेंडुलकरच्या हळदीचे फोटो आले समोर

दरम्यान, गौतमीचा होणारा नवरा स्वानंद तेंडुलकर मराठीमधलं पहिलं डिजिटल चॅनेल ‘भाडिपा’चा बिझनेस हेड आहे. त्याचे मजेशीर व्हिडीओ नेहमी सोशल मीडियावर व्हायरल होत असतात.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Gautami deshpande and swanand tendulkar sangeet ceremony video viral pps