अभिनेत्री गौतमी देशपांडे सध्या तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चांगलीच चर्चेत आली आहे. नुकताच २५ डिसेंबरला गौतमीचा स्वानंद तेंडुलकरबरोबर मोठ्या थाटामाटात लग्नसोहळा पार पडला. देशपांडेंची लाडकी लेक गौतमी आता तेंडुलकरांची सून झाली. मेहंदी, हळद, संगीत, सप्तपदी असा समारंभपूर्वक गौतमीचा लग्नसोहळा पाहायला मिळाला. अजूनही गौतमीच्या लग्नाचे फोटो आणि व्हिडीओ चर्चेत आहेत.

नुकताच अभिनेत्री गौतमी देशपांडेने लग्नसोहळ्याचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यामध्ये मेहंदीपासून ते सप्तपदीपर्यंतचे खास क्षण पाहायला मिळत आहे. महत्त्वाचं म्हणजे या व्हिडीओत गौतमी- स्वानंद कशी त्यांची लव्हस्टोरी सुरू झाली हे सांगत आहेत. कोणी-कोणाला पहिलं प्रपोज केलं? एकमेकांना भेटल्यानंतर मैत्रीचं रुपांतर कसं प्रेमात झालं? असं सर्व काही गौतमी-स्वानंद या व्हिडीओत सांगताना दिसत आहेत.

satya movie rerelease
‘मुंबई का किंग कौन?…’, २६ वर्षांनी मनोज बाजपेयी यांचा ‘हा’ सिनेमा पुन्हा होणार प्रदर्शित
Walmik Karad Surrender Case
वाल्मिक कराड ज्या गाडीतून शरण आला त्या गाडीच्या…
Vishal Gawli News
Vishal Gawli : “विशाल गवळीने माझ्या मुलीला जवळ ओढलं, तिचं तोंड दाबलं आणि…”, पीडितेच्या आईने सांगितला दोन वर्षांपूर्वीचा ‘तो’ प्रसंंग
dhananjay munde valmik karad santosh deshmukh murder
Dhananjay Munde: “हे असले बॉस?” धनंजय मुंडेंचं हातात पिस्तुल घेतलेलं रील शेअर करत अंजली दमानियांची पोस्ट; ‘त्या’ व्हिडीओचाही समावेश!
Ranveer Allahbadiya
गोव्याच्या समुद्रात बुडत होते प्रसिद्ध युट्यूबर अन् त्याची गर्लफ्रेंड; IPS अधिकाऱ्याच्या कुटुंबाने वाचवले जीव, थरारक प्रसंग सांगत म्हणाला…
Bigg Boss Marathi Season 5 Fame Jahnavi Killekar make reel video with son Ishan
Video: “सारी उमर चल दूँगी साथ तेरे…”, ‘बिग बॉस मराठी’नंतर जान्हवी किल्लेकरने पहिल्यांदाच लेकाबरोबर केला Reel व्हिडीओ, पाहा
Gaurav More Hindi Film movie poster
फिल्टरपाड्याचा बच्चन हिंदी सिनेमात झळकणार! गौरव मोरेने शेअर केलं पहिलं पोस्टर; म्हणाला, “आशीर्वाद…”
Lakhat Ek Aamcha Dada
‘लाखात एक आमचा दादा’ मालिकेतील तेजू-शत्रूने शेअर केला व्हिडीओ; अधोक्षज कऱ्हाडेच्या कमेंटने वेधले लक्ष, म्हणाला…

हेही वाचा – मुक्ता-सागरच्या लग्नामुळे ‘प्रेमाची गोष्ट’ मालिका ठरली नंबर १, जाणून घ्या टॉप १० मालिका

व्हिडीओच्या सुरुवातीला स्वानंद म्हणतो, “खूप प्रामाणिकपणे सांगतो. मुळातच मला ती बघूनच आवडली होती. तिला मी हे सांगितलं नाही. आता मी ही गोष्ट सांगतोय. तिला मी विचारलं होतं, मी डेट करू शकतो का? ती मला म्हणाली, नाही.” त्यानंतर गौतमी म्हणते, “थोडीशी मैत्री वाढली, बोलणं वाढलं. त्याच्यानंतर मला तो जास्त आवडायला लागला आणि मला नंतर कळलं की, हे सगळं मस्त चाललंय. छान आहे हे सगळंच. खूप गोड आहे.”

दरम्यान, गौतमी-स्वानंदच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर, ‘माझी होशील ना’ या मालिकेनंतर सध्या ती ‘गालिब’ या नाटकात काम करत आहे. या नाटकामध्ये तिच्याबरोबर अभिनेता विराजस कुलकर्णी पाहायला मिळत आहे. तसंच गौतमीचा नवरा स्वानंद हा मराठीमधलं पहिलं डिजिटल चॅनेल ‘भाडिपा’चा बिझनेस हेड आहे. शिवाय तो सोशल मीडियावर मजेशीर व्हिडीओ करत असतो.

Story img Loader