मृण्मयी देशपांडे आणि गौतमी देशपांडे ही मराठी मनोरंजन सृष्टीतील बहीणींची लोकप्रिय जोडी. आपल्या मोठ्या बहिणीच्या पावलावर पाऊल टाकत गौतमीनेही कलाविश्वात तिचं स्वतःचं स्थान निर्माण केलं आहे. त्यांच्या कामाबरोबरच त्या दोघी त्यांच्यातल्या बॉंडिंगमुळे सर्वांचं लक्ष वेधून घेत असतात. एका फोटोवर गौतमीने केलेली कमेंट खूप चर्चेत आली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

गौतमी आणि मृण्मयी कायम एकमेकींचे गमतीशीर व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत असतात. त्यात अनेकदा त्या एकमेकांशी भांडताना, एकमेकींच्या खोड्या काढतानाही दिसतात. तर आता मृण्मयीने पोस्ट केलेला एक फोटो पाहून गौतमी चांगलीच वैतागली आहे.

आणखी वाचा : “त्यांच्यासारखा पर डे…” गौतमी देशपांडेने व्यक्त केली खंत, पोस्ट चर्चेत

मृण्मयी देशपांडे ही गेले अनेक महिन्यांपासून महाबळेश्वरला राहत आहे. तिथे त्यांनी घरही बांधलं आहे. तर कामानिमित्त तिचं मुंबई-पुण्याला येणं होतं. काही दिवसांपूर्वी ती कामानिमित्त मुंबईत आली होती आणि आता ती परत महाबळेश्वरला गेली आहे. महाबळेश्वरला पोहोचल्यानंतर मृण्मयीने तिचा एक सेल्फी पोस्ट केला आणि लिहिलं, “मी पोहोचले महाबळेश्वरला…” तिचा हा फोटो पाहून गौतमी मात्र रागावली. तिने लिहिलं, “ढाप अजून माझे कपडे आणि म्हण मी गेल्या दोन वर्षात एक नवीन कपडा घेतला नाही.”

हेही वाचा : Video: “मला त्रास देणं बंद कर…” वैतागलेल्या गौतमीला बहिणीचं भन्नाट उत्तर, म्हणाली…

आता मृण्मयीच्या या फोटोवर गौतमीने केलेली ही कमेंट चांगलीच चर्चेत आली आहे. तर या कमेंटला गौतमीच्या चाहत्यांनी विविध प्रतिक्रिया देत तिची बाजू घेतली आहे. पण अद्याप मृण्मयीने तिच्या हटके शैलीत गौतमीच्या या कमेंटला उत्तर दिलेलं नाही. यावर आता गौतमी कशी व्यक्त होते हे पाहण्यासाठी सर्वजण उत्सुक झाले आहेत.