अभिनेत्री गौतमी देशपांडे ही मराठी मनोरंजन सृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. गौतमीने तिची मोठी बहीण अभिनेत्री मृण्मयी देशपांडेच्या पावलावर पाऊल ठेवून अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं आणि स्वतःच्या टॅलेंटने वेगळं स्थान निर्माण केलं. तर आता मृण्मयी आणि गौतमीची तुलना करणाऱ्या एका नेटकार्‍याला गौतमीने सडेतोड उत्तर दिलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

गौतमी सोशल मीडियावर सक्रिय राहून नेहमीच तिच्या चाहत्यांच्या संपर्कात असते. नुकताच तिने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवरून चाहत्यांशी संवाद साधला. काल गौतमी रिक्षेतून कुठेतरी बाहेर जात होती. तेव्हा इन्स्टाग्रामवर स्टोरीवर एक प्रश्न उत्तरांच सेशन घेऊन तिने ती कुठे जात असेल हे चाहत्यांना ओळखायला सांगितलं.

आणखी वाचा : गौतमी देशपांडे ‘या’ लोकप्रिय अभिनेत्याला करतेय डेट? सई ताम्हणकरच्या कमेंटवर उत्तर देत मृण्मयी म्हणाली…

गौतमीच्या या प्रश्नावर तिच्या चाहत्यांनी विविध उत्तरं दिली. तर या दरम्यान एका नेटकऱ्याने लिहिलं, “तुझ्याकडे गाडी नाहीये का? सारखं रिक्षातून फिरत असतेस. तुझी बहीण बघ किती सुंदर आणि कर्तुत्ववान.” नेटकऱ्याच्या या प्रतिक्रियेवर गौतमीनेही तिच्या शैलीत उत्तर देत त्याला गप्प केलं. त्याची ही प्रतिक्रिया इन्स्टाग्राम स्टोरीवर शेअर करत तिने लिहिलं, “मला अशी लोकं आवडतात. तुमच्या प्रश्नाचं उत्तर असं आहे की, माझ्याकडे चांगली गाडी आहे पण मुंबईत असल्यावर बऱ्याचदा मेट्रोतून प्रवास करणं सोयीस्कर असतं. माझ्या गाडीपेक्षा मला माझा वेळ जास्त मौल्यवान आहे. मला आशा आहे की तुम्ही मोठे व्हाल आणि कर्तुत्ववान व्हाल.”

हेही वाचा : गौतमी देशपांडेचा तिच्या लव्ह लाईफबद्दल मोठा खुलासा, बॉयफ्रेंडचा फोटो पोस्ट करत म्हणाली…

गौतमीने शेअर केलेल्या या स्टोरीने सर्वांचंच लक्ष वेधून घेतलं आहे. त्यामुळे आता पुन्हा एकदा गौतमी तिच्या हजरजबाबीपणामुळे चर्चेत आली आहे.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Gautami deshpande gives reply to a user who tries to compare her with mrunmayee deshpande rnv