मालिकांमधून आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणारी अभिनेत्री गौतमी देशपांडे सध्या तिच्या लग्नामुळे चांगलीच चर्चेत आहे. २५ डिसेंबरला तिने कंटेंट क्रिएटर स्वानंद तेंडुलकरबरोबर लग्नगाठ बांधून आयुष्याच्या नव्या वाटेवर पाऊल ठेवलं. त्यामुळे सध्या गौतमीचं लग्न, लग्नातचे पेहराव, मंगळसूत्र, नवरा याविषयी बरीच चर्चा रंगली आहे. पण लग्नानंतर गौतमी-स्वानंदी सोशल मीडियावर पुन्हा सक्रिय झाले आहेत. लग्नानंतरचे फोटो चाहत्यांबरोबर शेअर करत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

कालच, २८ डिसेंबरला गौतमीने लग्नानंतर झालेल्या अवस्थेचा फोटो शेअर केला होता. “लग्नानंतर झालेला परिणाम”, असं लिहित तिने हा फोटो शेअर केला होता. तिच्या हा फोटो चांगलाच चर्चेत आला. त्यानंतर आता गौतमीचा नवरा स्वानंदची एक पोस्ट चांगलीच चर्चेत आली आहे. ज्यामध्ये तो गौतमीला म्हणाला, “बायको असशील घरी.” असं तो का म्हणाला? जाणून घ्या…

हेही वाचा – Video: ‘झी मराठी’वरील दोन नव्या मालिकांचे प्रोमो समोर, ‘या’ अभिनेत्री झळकणार मुख्य भूमिकेत

स्वानंद तेंडुलकरने काही तासांपूर्वी बायको गौतमीचा इन्स्टाग्राम स्टोरीला एक फोटो शेअर केला आहे. ज्यामध्ये दोघं फिरायला जाताना दिसत आहेत. या फोटोमध्ये गौतमीचं निखळ हास्य पाहायला मिळत असून त्यावर स्वानंदने लिहिलं आहे, “माफ कर. पण मी माझा स्नॅक्स तुझ्याबरोबर शेअर करू शकत नाही. बायको असशील घरी.” स्वानंदची हीच पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. तसेच त्याने वीकेंडच्या ट्रीपचे बरेच फोटो इन्स्टाग्राम स्टोरीवर शेअर केले आहेत.

दरम्यान, काही महिन्यांपासून एका फोटोमुळे गौतमीचं स्वानंदबरोबर अफेअर असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. अनेक ठिकाणी तिला याबाबत विचारण्यात आलं. पण तिने याबाबत मौन पाळलं. पण अखेर २३, डिसेंबरला गौतमीने थेट मेहंदी समारंभाचा फोटो शेअर करून प्रेम जाहीर केलं. त्यानंतर गौतमी-स्वानंद लग्नसोहळा पाहायला मिळाला.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Gautami deshpande husband swanand tendulkar social media post viral pps