‘माझा होशील ना’ मधून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री गौतमी देशपांडे २५ डिसेंबरला लग्नबंधनात अडकली. स्वानंद तेंडुलकरबरोबर तिचा मोठ्या थाटामाटात लग्नसोहळा पार पडला. मेहंदी, हळद, संगीत, सप्तपदी असा समारंभपूर्वक गौतमीचा लग्नसोहळा पाहायला मिळाला. अजूनही गौतमीच्या लग्नाचे फोटो आणि व्हिडीओ चर्चेत आहेत.

नुकतीच गौतमी देशपांडेने नवऱ्याबरोबर ‘राजश्री मराठी’ या युट्यूब चॅनलला मुलाखत दिली. यावेळी दोघं पहिल्यांदा कसे भेटले?, कोणी पहिल्यांदा प्रपोज केलं?, मग लग्नाची तयारी कशी केली? असे अनेक प्रश्न विचारण्यात आले. यादरम्यान दोघांना एकमेकांमधली कोणती सवय बदलायला आवडले? असं विचारलं. तेव्हा स्वानंदने गौतमीची एका सवयी खुलासा केला.

Image Of Supriya Sule And Ajit Pawar
Supriya Sule : “मी बोलते, पण अजित पवार माझ्याशी…”, पवार कुटुंबीयांतील दुराव्याबाबत सुप्रिया सुळेंचे मोठे विधान
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Sadanand literary conference
सांगली: जात घट्ट कराल तसा माणूस पातळ होईल; लवटे
Abdul Sattar
Abdul Sattar : अब्दुल सत्तार यांची मोठी घोषणा; “निवडणुकीत जात आणि धर्म आणला जातो, त्यामुळे यापुढे….”
Gulabrao Patil insta
जळगावचं पालकमंत्रिपद पुन्हा गुलाबराव पाटलांकडेच? घोषणेआधीच मोठं वक्तव्य; विरोधकांना दमबाजी करत म्हणाले…
Guardian Minister Controversy
Manikrao Kokate : पालकमंत्री पदाचा तिढा कधी सुटणार? अजित पवार गटाच्या नेत्याचं मोठं विधान; म्हणाले, “आता निर्णय…”
Chhagan Bhujbal
Chhagan Bhujbal : ‘अनेकांचे पतंग कापले, पण माझा पतंग कुणीही कापलेला नाही’, छगन भुजबळांचं सूचक विधान
Devendra Fadnavis and Divija Fadnavis
Devendra Fadnavis : देवेंद्र फडणवीसांकडून लेक दिविजाचं तोंडभरून कौतुक; हुशारीचं वर्णन करताना म्हणाले, “तिच्यातील प्रगल्भता…”

हेही वाचा – “काही कार्यक्रमांमधून मी अत्यंत कुचका अन्…”, राज ठाकरेंच्या टोपणनावाच्या मुद्द्यावर मत मांडताना आनंद इंगळे स्पष्टच बोलले, म्हणाले…

स्वानंद म्हणाला, “मी हिची एकच सवय बदलेन, आळस. आमच्याकडे आळस खूप आहे आणि साधसुधा नाही. एक पोत भरून आळस आहे. एकदम पद्धतशीर. पण तो कधी आहे, जेव्हा काही नसतं म्हणजेच काम वगैरे नसतात तेव्हा. उदाहरणार्थ, आता तिला मुलाखतीला यायचं होतं, तर ती माझ्या आधी तयार होऊन खाली होती. पण तिला काही करायचं नसेल, तर तेव्हा ती उठणारचं नाही. अशावेळी तिला उठवून दाखवावं. ती उठतंच नाही. मी तिची ही सवय बदलू इच्छितो. पण मला याचा काहीच प्रोब्लेम नाही. त्यामुळे मी पण आता थोडा आळशी झालोय.”

हेही वाचा – Video: लाडक्या लेकीला लग्नाच्या बेडीत अडकताना पाहून आमिर खानच्या डोळ्यात पाणी, व्हिडीओ व्हायरल

दरम्यान, गौतमी-स्वानंदच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर, ‘माझी होशील ना’ या मालिकेनंतर सध्या ती ‘गालिब’ या नाटकात काम करत आहे. या नाटकामध्ये तिच्याबरोबर अभिनेता विराजस कुलकर्णी पाहायला मिळत आहे. तसंच गौतमीचा नवरा स्वानंद हा मराठीमधलं पहिलं डिजिटल चॅनेल ‘भाडिपा’चा बिझनेस हेड आहे. शिवाय तो सोशल मीडियावर मजेशीर व्हिडीओ करत असतो.

Story img Loader