‘सबसे कातिल गौतमी पाटील’ अशी ओळख असणारी गौतमी पाटील नेहमी चर्चेत असते. आपल्या नृत्य कौशल्याने आणि दिलखेच अदाने महाराष्ट्राला अक्षरशः वेड लावणारी गौतमी अनेकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे. कोणताही समारंभ असो तिथे गौतमीचा कार्यक्रम आता आवुर्जन ठेवला जातो. राज्यात तिचा प्रचंड मोठा चाहता वर्ग असल्यामुळे तिच्या कार्यक्रमाला देखील मोठ्या प्रमाणात गर्दी होतं असते. अशा या लोकप्रिय नृत्यांगनाबरोबर लवकरच ‘बिग बॉस मराठी’ फेम अभिनेता झळकणार आहे.
‘बिग बॉस मराठी’ फेम अभिनेता, संगीतकार, गायक उत्कर्ष शिंदेबरोबर गौतमी पाहायला मिळणार आहे. एका नव्या लावणीमध्ये गौतमीसह उत्कर्ष झळकणार आहे. यासंदर्भात उत्कर्षने स्वतः सोशल मीडियावर पोस्ट केली आहे. गौतमीबरोबर व्हिडीओ शेअर करत उत्कर्षने लिहिलं आहे, “गौतमी पाटील आणि शिंदेशाही एकत्र नव्या ढंगात…’आहो शेठ लय दिसान झालीया भेट’ या मी संगीतबद्ध केलेल्या माझ्या लावणीच्या अभुतपूर्व यशानंतर, आता नव्याने घेऊन येतोय मी लिहिलेली, मी संगीतबद्ध केलेली नवी लावणी ‘आलं बाई दाजी माझं’.”
हेही वाचा – Video: ‘ठिपक्यांची रांगोळी’ फेम अभिनेत्रीची ‘शुभविवाह’ मालिकेत एन्ट्री, झळकणार महत्त्वाच्या भूमिकेत
हेही वाचा – अक्षय कुमारच्या ‘या’ चित्रपटात होत्या तब्बल १५ अभिनेत्री, ३० कोटींचं बजेट असलेल्या सिनेमाने कमावले होते…
उत्कर्षची ही पोस्ट सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाली आहे. या पोस्टवर नेटकऱ्यांच्या कमेंट्सचा पाऊस पडला आहे. अभिनेता जितेंद्र जोशीने आगीचे इमोजी शेअर केले आहेत. ज्यावर उत्कर्षने जितेंद्र जोशीचे आभार मानले आहेत. याशिवाय “कमाल”, “दोन आवडते कलाकार एकत्र. अनपेक्षित जोडी आहे”, “भावाचा नाद नाही करायचा”, “कडक दिसताय की राव”, “शिंदेशाही तोडा”, “भाई एक नंबर”, “विषय खतम”, “व्वा येऊ द्या लवकर”, “एकदम भारी” अशा अनेक प्रतिक्रिया उत्कर्षच्या पोस्टवर नेटकऱ्यांनी दिल्या आहेत. उत्कर्ष या पोस्टनंतर चाहत्यांमध्ये आता गौतमीबरोबर येणाऱ्या नव्या लावणीची उत्सुकता पाहायला मिळत आहे.
हेही वाचा – थाटात लग्न केल्यावर ‘कन्यादान’ फेम जोडी निघाली हनिमूनला; पासपोर्टचा फोटो शेअर करत म्हणाले…
दरम्यान, उत्कर्षच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर, तो ‘बिग बॉस मराठी’मुळे अधिक प्रकाश झोतात आला. आता तो लवकरच लोकप्रिय दिग्दर्शक महेश मांजरेकरांच्या ‘वेडात मराठे वीर दौडले सात’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटात वीर सूर्याजी दांडकर यांच्या भूमिकेत उत्कर्ष दिसणार आहे.