Gautami Patil met Arun Kadam : ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ हा प्रेक्षकांना खळखळून हसवणारा लोकप्रिय विनोदी कार्यक्रम आहे. या कार्यक्रमाचे फक्त महाराष्ट्रातच नाही तर जगभरात असंख्य चाहते आहेत. या कार्यक्रमातील कलाकार आणि त्यांचे विनोद याची खूप चर्चा होत असते. यातील दादूस म्हणजेच अरुण कदम विविध पात्र साकारून प्रेक्षकांचे मनोरंजन करतात.
अरुण कदम अनेक कार्यक्रमांना हजेरी लावत असतात. नुकतीच त्यांची व डान्सर गौतमी पाटील हिची एका कार्यक्रमात भेट झाली. या भेटीचा व्हिडीओ गौतमी पाटीलने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केला आहे. कॉमेडी किंग, लाडका दादूस अरुण कदम असं कॅप्शन देत तिने हा व्हिडीओ पोस्ट केला आहे.
हेही वाचा – Video: “तू माझी हिरोईन आहेस”, सूरज चव्हाणला भेटायली आली ‘ती’; नेटकरी म्हणाले, “हीच आमची वहिनी शोभेल”
व्हिडीओमध्ये दिसतं की गौतमी अरुण कदम यांच्या पाया पडते आणि आशीर्वाद घेते, त्यानंतर अरुण कदम गौतमीबरोबर सेल्फी घेण्यासाठी फोन ऑन करतात, तेव्हा त्यांचा फोन घेऊन गौतमी पाटील स्वतःच त्यांच्याबरोबर सेल्फी घेते. गौतमीने हा व्हिडीओ शेअर केल्यावर त्यावर चाहते लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करत आहेत.
पाहा व्हिडीओ –
‘गौतमीवर विनाकारण टीका करणाऱ्यांनी बघा ती किती संस्कार जपणारी आहे,’ ‘वरीष्ठ कलाकारांना आदर द्यायचा कळतं तिला म्हणून ती सुद्धा आज मोठी कलाकार आहे,’ ‘एक मोठा कलाकार स्वतःहून सेल्फी मागतो ही आपल्या कामाची फार मोठी पावती आहे,’ ‘खूप छान.. आपल्या पेक्षा मोठ्या कलाकारांना सन्मान देणं हीच खरी संस्कृती आहे,’ ‘संस्कार’, ‘वाह गौतमी तुला खरंच गर्व नाही, ग्रेट’ अशा कमेंट्स या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी केल्या आहेत. तसेच अनेकांनी या व्हिडीओवर रेड हार्ट इमोजी पोस्ट केले आहेत.

दरम्यान, नुकताच येवल्यात एक कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमात गौतमी पाटील व अरुण कदम यांना बोलावण्यात आलं होतं. त्याच कार्यक्रमातील हा व्हिडीओ आहे.