Bigg Boss Marathi Season 5 : ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या पर्वाचा आता सहावा आठवडा सुरू आहे. पाचव्या आठवड्यात ‘बिग बॉस मराठी’च्या घरात नेहमीप्रमाणे गोंधळ पाहायला मिळाला. पण पाचवा आठवडा खास होता. कारण सदस्यांच्या जोड्या बनवल्या होत्या. याच जोड्या आठवडाभर एकत्र खेळ खेळताना दिसल्या. मात्र यावेळीही जोरदार वाद झाले. त्यानंतर ‘बिग बॉस मराठी’चा सहावा आठवडा देखील दणक्यात सुरू झाला आहे.
सोमवार, २ सप्टेंबरला नॉमिनेशन टास्क पार पडला. या नॉमिनेशन टास्कमध्ये घन:श्याम दरवडे, आर्या जाधव, सूरज चव्हाण, धनंजय पोवार, निक्की तांबोळी, अरबाज पटेल आणि अभिजीत सावंत या सात सदस्यांना घरातल्या इतर सदस्यांनी नॉमिनेट केलं. त्यामुळे आता या सात सदस्यांपैकी कोण या आठवड्यात घराबाहेर जाणार? हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. अशातच दुसऱ्या बाजूला वाइल्ड कार्ड एन्ट्रीची चर्चा सुरू आहे. ‘बिग बॉस मरा’ठीच्या पाचव्या पर्वात कोण वाइल्ड कार्ड एन्ट्री करणार? याकडे सगळ्यांच्या नजरा लागल्या आहेत. या वाइल्ड कार्ड एन्ट्रीमध्ये गौतमी पाटीलचं नाव घेतलं जात आहे. पण खरंच गौतमी पाटील ‘बिग बॉस मराठी’मध्ये जाणार का? हे स्वतः तिने सांगितलं आहे.
महाराष्ट्राला आपल्या दिलखेच अदा आणि नृत्यामुळे वेड लावणारी नृत्यांगणा गौतमी पाटील नेहमी चर्चेत असते. तिच्या अदा-नृत्याचा एक मोठा चाहता वर्ग तयार झाला आहे. म्हणून तिच्या प्रत्येक कार्यक्रमाला मोठ्या प्रमाणात गर्दी होतं असते. अलीकडेच दहीहंडी आणि गणपती आगमनात गौतमी पाटीलचा कार्यक्रम पाहायला मिळाला. अशी ही लोकप्रिय नृत्यांगणा ‘बिग बॉस मराठी’मध्ये जाण्याविषयी काय म्हणाली? जाणून घ्या…
गौतमी पाटील ‘बिग बॉस मराठी’ बघते का?
‘स्टार मीडिया मराठी’शी संवाद साधताना गौतमीला विचारण्यात आलं की, ‘बिग बॉस मराठी’मध्ये गौतमी पाटील जाणार हे कितपत खरं आहे? आणि तुला जर ऑफर आली तर जायला आवडेल का? गौतमी दोन शब्दात उत्तर देत म्हणाली, “नो कमेंट्स.” त्यानंतर तिला विचारलं की, तू ‘बिग बॉस मराठी’ला किती फॉलो करते. यावर ती म्हणाली, “मी घरी जास्त नसते. माझे बाहेरचं दौरे खूप असतात. त्यामुळे मी टीव्ही बघू शकत नाही. मला त्यात रस आहे. पण मी बघू शकत नाही. कारण माझा बाहेरचा दौरा खूप असतो.”
हेही वाचा – Video: ‘लाखात एक आमचा दादा’ फेम नितीश चव्हाण मालिकेच्या सेटवर दिसला चिंच खाताना, पाहा व्हिडीओ
पुढे गौतमी पाटीलला सूरज चव्हाणविषयी विचारलं गेलं. तेव्हा गौतमी म्हणाली, “सूरज बेस्ट्स ऑफ लक. तूच जिंकून ये, एवढंच मी सांगू शकते.” तसंच गौतमीने तिच्या आगामी प्रोजेक्टविषयी सांगितलं. “माझा नवा मराठी चित्रपट येतोय. त्यात आयटम साँग आहे आवर्जुन बघा”, असं गौतमी म्हणाली.
© IE Online Media Services (P) Ltd