Genelia Deshmukh Post For Suraj Chavan: बारामतीचा रीलस्टार सूरज चव्हाण बिग बॉस मराठीच्या पाचव्या पर्वाचा विजेता ठरला आहे. अभिजीत सावंत व सूरज टॉप २ सदस्य होते, त्यापैकी प्रेक्षकांची जास्त मतं मिळवून या शोची ट्रॉफी जिंकण्यात सूरज चव्हाण यशस्वी ठरल्या. बिग बॉस मराठीच्या पाचव्या पर्वाचा ग्रँड फिनाले जल्लोषात पार पडल्यावर आणि सूरज चव्हाण विजेता ठरल्यावर जिनिलीया देशमुखच्या पोस्टने लक्ष वेधले आहे.
रितेश देशमुखने बिग बॉस मराठीचे पाचवे पर्व होस्ट केले आणि या शोने टीआरपीचे रेकॉर्ड मोडले. बिग बॉस मराठीच्या पाच पर्वांपैकी हे पर्व ब्लॉकबस्टर ठरले. आज ग्रँड फिनालेमध्ये विजेत्याची घोषणा केल्यावर होस्ट रितेश देखमुखने विजेता सूरज चव्हाण व उपविजेता अभिजीत सावंत यांच्याबरोबर सेल्फी काढले. ते सेल्फी त्याने इन्स्टाग्रामवर पोस्ट केले आहेत. त्याची हीच पोस्ट इन्स्टाग्राम स्टोरीवर शेअर करत जिनिलीयाने सूरज चव्हाणचं अभिनंदन केलं आणि पती रितेशच्या होस्टिंगचं कौतुक केलं.
“याला म्हणतात स्वप्न सत्यात उतरवणं, नेहमी मोठी स्वप्नं बघा…सूरज चव्हाण ही ट्रॉफी फक्त तुझी आहे. रितेश देशमुख काय सूत्रसंचालन केलंस…तू सर्वात बेस्ट आहेस..कलर्स मराठी टीम मी पुढच्या सीझनची वाट पाहू शकत नाही..”, असं जिनिलीया म्हणाली.
जिनिलीयाने बिग बॉस मराठीच्या ग्रँड फिनालेला हजेरी लावली होती. सूरज चव्हाण बिग बॉस मराठीचा विजेता ठरल्यानंतर जिनिलीया देशमुखने पती रितेशसह सूरज चव्हाणबरोबर फोटो काढले. ते फोटो मुश्ताक शेखने त्याच्या इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.
हेही वाचा – Bigg Boss Marathi 5 चा उपविजेता ठरलेल्या अभिजीत सावंतची पहिली पोस्ट; म्हणाला, “मला जे वाटतंय ते…”
बिग बॉस मराठीचे ब्लॉकबस्टर पर्व ७० दिवस प्रेक्षकांचे मनोरंजन केल्यानंतर आज संपले. टीआरपीच्या बाबतीत यंदाच्या पर्वाने इतिहास रचला. या शोला प्रचंड लोकप्रियता मिळाली. एकूण १६ स्पर्धक या शोमध्ये सहभागी झाले होते. त्यापैकी अभिजीत सावंत व सूरज चव्हाण टॉप २ सदस्य होते. प्रेक्षकांची मतं सूरजला जास्त मिळाली आणि तो या पर्वाचा विजेता ठरला.