Gharoghari Matichya Chuli : सोशल मीडियावर नेहमी विविध भाषांमधील गाणी ट्रेंड होत असतात. त्यामुळे युजरसह कलाकार मंडळी ट्रेंडिंग गाण्यावर रील करत असतात. त्यानंतर ही गाणी अधिक हिट होतात. गेल्या काही महिन्यांपासून ‘ओ पिलगा व्यंकटी’ नावाच तेलुगू लोकगीत खूप ट्रेंड होत आहे. या गाण्यातील हूकस्टेपने सगळ्यांना अक्षरशः वेड लावलं आहे. याच ट्रेंड होत असलेल्या तेलुगू लोकगीतावर ‘घरोघरी मातीच्या चुली’ मालिकेतील जानकी म्हणजे अभिनेत्री रेश्मा शिंदेने जाऊबाई अवंतिकाबरोबर म्हणजेच अभिनेत्री ऋतुजा कुलकर्णीबरोबर भन्नाट डान्स केला आहे. याचा व्हिडीओ सध्या व्हायरल होतं आहे.
अभिनेत्री रेश्मा शिंदेने हा भन्नाट डान्स व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. “जानकी, अवंतिकाचा पहिला रील व्हिडीओ…पहिल्या टेकमध्ये ओके…”, असं कॅप्शन लिहित रेश्माने डान्स व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये दोघी ‘ओ पिलगा व्यंकटी’ गाण्यावर जबरदस्त थिरकताना दिसत आहेत. दोघींचा डान्स पाहून इतर कलाकार मंडळींसह चाहत्यांनी भरभरून प्रतिक्रिया दिल्या आहेत.
‘घरोघरी मातीच्या चुली’ मालिकेतील सारंग म्हणजे अभिनेता उदय नेने म्हणाला की, वहिनी रॉक. तर अभिनेत्री ऋतुजा कुलकर्णी ( अवंतिका ) म्हणाली, “माझ्या मेकअप रुममधील सकाळी सुंदर केल्याबद्दल मी तुझी आभारी आहे.” तसंच नेटकऱ्यांनी लिहिलं, “जावा जावा जबरदस्त”, “मस्त”, “खूप सुंदर”, “तुमच्या दोघींच्या डान्सने आग लावली”, “गाण्याचा आणि तुमच्या डान्सचा मेळ छान जमलाय”, अशा विविध प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी दिल्या आहेत.
सध्या ‘घरोघरी मातीच्या चुली’ मालिकेत काय सुरू आहे?
दरम्यान, ‘घरोघरी मातीच्या चुली’ मालिकेत जानकी आणि हृषिकेश आपल्या लाडकी लेक ओवीबरोबर वेगवेगळे राहत आहेत. रणदिवेंच्या घरातून जानकी आणि हृषिकेशला बाहेर काढलं आहे. पण दोघांना पुन्हा मानाने घरी आणण्यासाठी सौमित्र आणि अवंतिका सातत्याने प्रयत्न करताना दिसत आहेत. नुकत्याच समोर आलेल्या प्रोमोमध्ये जानकी ऐश्वर्याला आव्हान देताना दिसत आहे. जानकी ऐश्वर्याला म्हणाली, “ज्या घरातून हाकलंयस त्याच घरात वाजत-गाजत मी पुन्हा येईन.”
© IE Online Media Services (P) Ltd