Reshma Shinde Kelvan: ‘रंग माझा वेगळा’, ‘घरोघरी मातीच्या चुली’ या मालिकांमधील अभिनेत्री रेश्मा शिंदे आता आयुष्याच्या नव्या प्रवासाला सुरुवात करणार आहे. लवकरच रेश्मा लग्नबंधनात अडकणार आहे. नुकतंच तिचं केळवण झालं. या केळवणाचे फोटो तिने स्वतः सोशल मीडियावर शेअर करून चाहत्यांना सुखद धक्का दिला. ‘रंग माझा वेगळा’ मालिकेच्या टीमसह सुयश टिळक, ऋतुजा बागवे यांनी रेश्माचं केळवण केलं. सध्या अभिनेत्रीच्या केळवणाचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले आहेत. अशातच तिच्या हटके एन्ट्रीचा व्हिडीओ समोर आला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अभिनेत्री रेश्मा शिंदेने काल, २२ नोव्हेंबरला केळवणाचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले. “जीवनात ही घडी अशीच राहू दे”, असं कॅप्शन लिहित अभिनेत्रीने केळवणातील खास क्षण पोस्ट केले. केळवणासाठी खास रेश्माने खास हिरव्या रंगाची साडी नेसली होती. या साडीवर तिने हिरव्या रंगाचा सुंदर नेकलेस घातला होता. ‘रंग माझा वेगळा’ मालिकेच्या टीमसह इतर कलाकारांनी रेश्माचं केळवण पारंपरिक पद्धतीने केलं.

हेही वाचा – Video: आता गौतमी पाटील अलका कुबल, सई ताम्हणकर अन् शिव ठाकरेबरोबर झळकणार, ‘त्या’ व्हिडीओमुळे रंगली चर्चा

रेश्माच्या केळवणासाठी खास फुलांची सजावट, पंचपक्वान्न करण्यात आलं होतं. भजी, आलू वडी, पनीरची भाजी, बटाट्याची भाजी, कारळ्याचे काप, कोशिंबीर, पोळी, भात, तूप, शेवयाची खीर, गुलाब जामुन, रस-मलाई, जिलेबी, आइस्क्रीम असे गोड-धोडचे पदार्थ रेश्माच्या केळवणासाठी खास करण्यात आले होते. तसंच रेश्माला आहेर म्हणून हिरव्या बांगड्या, साडी, गजरा अशा सौभाग्याच्या वस्तू देण्यात आल्या. यावेळी केक वगैरे कापूनही सेलिब्रेशन करण्यात आलं. रेश्माने केळवणाचे फोटो शेअर केल्यानंतर इतर कलाकारांनी तिला शुभेच्छा देण्यासाठी पोस्ट शेअर केल्या. यावेळी रेश्माचा ऑनस्क्रीन झालेला नवरा आशुतोष गोखलेने केळवणासाठीच्या तिच्या हटके एन्ट्रीचा व्हिडीओ शेअर केला आहे.

https://www.loksatta.com/wp-content/uploads/2024/11/Reshma-Shinde-Kelvan-2-2.mp4

अभिनेत्याने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये, लिफ्टमधून तो रेश्माला उचलून आणताना दिसत आहे. हे सगळं पाहून रेश्मा देखील आश्चर्य चकीत होते. त्यानंतर घरामध्ये एन्ट्री करताना रेश्मावर गुलाबाच्या पाकळ्यांचा वर्षा करून स्वागत केलं जात आहे. रेश्माच्या या हटके एन्ट्रीने सगळ्यांचं लक्ष वेधलं आहे.

हेही वाचा – “आजवर या प्रवासात…”, विशाखा सुभेदारच्या ‘त्या’ पोस्टने वेधलं लक्ष; म्हणाली, “माझ्याकडून…”

https://www.loksatta.com/wp-content/uploads/2024/11/Reshma-Shinde-Kelvan-17.mp4

हेही वाचा – “लाज लज्जा सोडून, कोणाची ही तमा न बाळगता…”, समीर परांजपेसाठी लोकप्रिय दिग्दर्शकाने लिहिलेली पोस्ट होतेय व्हायरल, वाचा

दरम्यान, रेश्मा शिंदेच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर, सध्या तिची ‘घरोघरी मातीच्या चुली’ मालिकेतील जानकी भूमिका प्रेक्षकांच्या चांगली पसंतीस पडली आहे. याआधी ‘रंग माझा वेगळा’ मालिकेत तिने साकारलेली दीपा अजूनही प्रेक्षकांच्या मनात कायम आहे. याशिवाय रेश्माने ‘नांदा सौख्यभरे’, ‘चाहूल’, ‘लगोरी’ या मालिकांमध्ये काम केलं आहे. तसंच तिने मराठीसह हिंदी मालिकाविश्वातही आपल्या अभिनयाची छाप उमटवली आहे. महत्त्वाचं म्हणजे आता ती अभिनयाबरोबर स्वतःचा व्यवसायदेखील करत आहे.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Gharoghari matichya chuli fame reshma shinde entry for kelvan watch video softnews pps