प्रसिद्ध गायिका श्रेया घोषालने गायलेलं ‘पुष्पा २’ चित्रपटातील ‘सूसेकी’ गाणं सध्या खूप ट्रेंड होतं आहे. गाण्याला प्रदर्शित होऊन महिनाही पूर्ण झालेला नाही. तरीही ६० मिलियनपेक्षा अधिक व्ह्यूज युट्यूबर ‘सूसेकी’ गाण्याला मिळाले आहेत. या गाण्याचे अनेक मॅशअप तयार झाले आहेत. जे सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतं आहेत. अशाच एका मॅशअप गाण्यावर ‘घरोघरी मातीच्या चुली’ मालिकेतील हृतिकेश व जानकीने डान्स केला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘स्टार प्रवाह’ वाहिनीवर काही महिन्यांपूर्वी ‘घरोघरी मातीच्या चुली’ मालिका सुरू झाली. एकत्र कुटुंब पद्धतीवर आधारित असलेली ही मालिका अल्पावधीत प्रेक्षकांच्या घराघरात पोहोचली. या मालिकेत अभिनेता सुमीत पुसावळेने साकारलेला हृषिकेश, रेश्मा शिंदेने साकारलेली जानकी, प्रतीक्षा मुणगेकरने साकारलेली ऐश्वर्या, आशुतोष पत्कीने साकारलेला सौमित्र अशा मालिकेतील सगळ्याच पात्रांनी प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. त्यामुळे मालिका सुरू झाल्यापासून टीआरपीच्या शर्यतीत अव्वल स्थानावर आहे. अशा या लोकप्रिय मालिकेतील दादा-वहिनीचा अर्थात हृषिकेश व जानकीचा ‘पुष्पा २’मधील ‘सूसेकी’ गाण्यावर मराठमोळा ठसका पाहायला मिळाला.

हेही वाचा – Video: ‘तुझेच मी गीत गात आहे’च्या चित्रीकरणाच्या शेवटच्या दिवशी स्वरा आणि मल्हारने केला खास आमरस, पाहा व्हिडीओ

सध्या सोशल मीडियावर ‘सूसेकी’ व ‘लाजरान साजरा मुखडा’ या गाण्यांचं मॅशअप खूप ट्रेंड होतं आहे. त्याचं ट्रेंडला फॉलो करत हृषिकेश व जानकीने जबरदस्त डान्स व्हिडीओ केला आहे. दोघांच्या या व्हिडीओने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं असून चाहत्यांच्या प्रतिक्रियांचा पाऊस पडत आहे.

हेही वाचा – ऐश्वर्या-अविनाश नारकरांच्या मुलाच्या गर्लफ्रेंडला पाहिलंत का? ‘झी मराठी’च्या नव्या मालिकेत झळकणार

हृषिकेश व जानकीच्या या व्हिडीओवर चाहत्यांनी भरभरून प्रतिक्रिया दिल्या आहेत. “एकदम झक्कास”, “काय जोडी आहे…कडक…खूप छान”, “बेस्ट जोडी”, “मस्त”, “ये बात…एकच नंबर”, “दोघे किती छान दिसता”, “नुसता जाळ”, “भारी” अशा अनेक प्रतिक्रिया चाहत्यांनी या व्हिडीओवर दिल्या आहेत.

हेही वाचा – अशोक सराफ यांना सात तास बसवलं होतं पोलीस ठाण्यात! स्वत: सांगितला धमाल किस्सा, वाचा

दरम्यान, ‘घरोघरी मातीच्या चुली’ मालिकेत रेश्मा, सुमीत, प्रतीक्षा, आशुतोष व्यतिरिक्त आरोही सांबरे, सविता प्रभुणे, भक्ती देसाई, उदय नेने, अक्षय वाघमारे, नयना आपटे, प्रमोद पवार, सुनील गोडसे, ऋतुजा कुलकर्णी, भाग्यश्री दळवी अशी तगडी कलाकार मंडळी पाहायला मिळत आहे. या मालिकेची दिवसेंदिवस लोकप्रियता वाढत आहे. त्यामुळे या मालिकेतील कलाकारही नेहमी चर्चेत असतात.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Gharoghari matichya chuli fame sumeet pusavale and reshma shinde dance on sooseki song of pushpa 2 the rule movie pps