८ मार्च रोजी दरवर्षी महिला दिन साजरा केला जातो. या दिनानिमित्त अनेक विशेष गोष्टी केल्या जातात. महिलांच्या सन्मानार्थ अनेक कार्यक्रम आयोजित केले जातात. आता याच निमित्ताने प्रेक्षकांचेदेखील मोठे मनोरंजन होणार आहे. याचे कारण म्हणजे प्रेक्षकांना त्यांच्या आवडत्या मालिकां(Serials)चा महासंगम पाहायला मिळणार आहे. त्यानिमित्ताने आता स्टार प्रवाहावरील सर्वांच्या लाडक्या मालिकांतील अभिनेत्री एकत्र आल्याचे दिसणार आहे. त्यामुळे प्रेक्षकांना त्यांच्या आवडत्या नायिकांना एकत्र पाहायला मिळणार आहे. आता या मालिका नेमक्या कधी प्रदर्शित होणार आणि कधी पाहायला मिळणार, याबद्दल जाणून घेऊ.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘स्टार प्रवाह’ वाहिनीने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. त्यामध्ये स्टार प्रवाह वाहिनीवर प्रदर्शित होणाऱ्या प्रत्येक मालिकेतील अभिनेत्रीची झलक पाहायला मिळत आहे. ‘घरोघरी मातीच्या चुली’मधील जानकी, ‘आई-बाबा रिटायर होत आहेत’मधल्या शुभा, ‘तू ही रे माझा मितवा’मधील ईश्वरी, ‘मुरांबा’मधील रमा, ‘लग्नानंतर होईलच प्रेम’मधील नंदिनी, ‘ठरलं तर मग’मधील सायली, ‘अबोली’मधील अबोली, ‘थोडं तुझं थोडं माझं’मधील मानसी, ‘शुभ विवाह’मधील मानसी, ‘येड लागलं प्रेमाचं’मधील मंजिरी, ‘लक्ष्मीच्या पावलांनी’मधील कला अशा सर्व मालिकांतील अभिनेत्रींची झलक पाहायला मिळणार आहे. या प्रोमोमध्ये असे ऐकायला मिळते की, ८ मार्चचा हा महिला दिन टेलिव्हिजनच्या इतिहासात पहिल्यांदाच साजरा होणार आहे. त्यात अभूतपूर्व असा महानायिकांचा महासंगम. दुपारी १ ते ३ आणि संध्याकाळी ६.३० ते ११.३० असे सात तास रंगणाऱ्या या कार्यक्रमात अभूतपूर्व असा महानायिकांचा महासंगम पाहायला मिळणार आहे.

स्टार प्रवाहवरील या मालिका लोकप्रिय आहेत. टीआरपीच्या शर्यतीत स्टार प्रवाहवरील काही मालिका आघाडीवर असल्याचे दिसते. या मालिकांतील अनेक पात्रे प्रेक्षकांची लाडकी आहेत. रेश्मा शिंदे, जुई गडकरी, निवेदिता सराफ, शिवानी सुर्वे, शिवानी बावकर, ईशा केसकर, मधुरा देशपांडे, स्वरदा ठिगळे, शिवानी मुंढेकर अशा अनेक लोकप्रिय अभिनेत्री या मालिकांत काम करताना दिसतात. सर्वच अभिनेत्रींनी त्यांच्या अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली असून, त्यांची पात्रे आता लोकप्रिय ठरली आहेत. मालिकेत सातत्याने येणाऱ्या ट्विस्टमुळे प्रेक्षकांना पुढे काय होणार ही उत्सुकता लागलेली असते.

दरम्यान, आता या महासंगममध्ये नक्की काय होणार, कोणत्या मालिकेत काय घडणार आणि कोणत्या मालिकेत ट्विस्ट येणार हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.