‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ हा कार्यक्रम गेल्या अनेक वर्षांपासून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. या कार्यक्रमाने अक्षरशः रसिक प्रेक्षकांना वेड लावलं आहे. या कार्य्रक्रमातील कलाकारांचेदेखील अनेक दिग्गज लोकांनी कौतूक केले आहे. या कार्यक्रमात चित्रपटाच्या प्रमोशनसाठी अनेक कलाकार येत असतात. आता अभिनेता जितेंद्र जोशी या कार्यक्रमात दिसणार आहे. विशेष म्हणजे तो या कार्यक्रमात एका स्किटमध्ये दिसणार आहे.
अभिनेता कवी जितेंद्र जोशी त्याच्या दमदार अभिनय कौशल्याची कमाल नाटक, टीव्ही, चित्रपट आणि वेब सीरिजमध्येही दाखवली आहे.राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय महोत्सवांमध्ये आपलं स्थान मिळवणारा जितेंद्र जोशी निर्मित ‘गोदावरी’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाच्या प्रमोशसाठी तो या कार्यक्रमात हजर राहणार आहे. विनोदवीर समीर चौगुलेबरोबर तो स्किट सादर करणार आहे. सोनी वाहिनीने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून त्याने ही पोस्ट शेअर केली आहे.
कीर्तनाच्या बरोबरीने रॉक संगीताचा ठसका, ‘हृदयी प्रीत जागते’ नव्या मालिकेचा भव्य प्रीमियर सोहळा
अभिनेता जितेंद्र जोशी हा सध्या त्याच्या ‘गोदावरी’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. येत्या ११ नोव्हेंबरला हा चित्रपट प्रदर्शित होत आहे. या चित्रपटात विक्रम गोखले. संजय मोने, नीना कुलकर्णी असे दिग्गज कलाकार दिसणार आहेत. नुकतंच या चित्रपटातील ‘खळ खळ गोदा’ हे गाणं प्रदर्शित झालं आणि लोकांनी त्याला उदंड प्रतिसाद दिला.
निखिल महाजन यांनी चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे त्यांनी याआधी ‘जून’, ‘बाजी’ ‘पुणे ५२’ अशा चित्रपटांचं दिग्दर्शन केलं आहे. या चित्रपटाच्या संगीताची धुरा ए.व्ही.प्रफुल्लचंद्रा यांच्या खांद्यावर आहे.