Kush Shah left Taarak Mehta Ka Ooltah Chasmah : ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ ही टीव्हीवरील विनोदी मालिका सुरू होऊन १६ वर्षे झाली आहेत. हा शो अजूनही प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे, पण इतक्या वर्षांत अनेक कलाकारांनी शो सोडला आहे. काहींनी वादांमुळे हा शो सोडण्याचा निर्णय घेतला, तर काहींनी इतर कारणांमुळे शोला अलविदा म्हटलं. आता आणखी एका कलाकाराने शो सोडल्याची बातमी समोर आली आहे. ‘गोली’ची भूमिका साकारणाऱ्या कुश शाहने आता ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’तून निरोप घेतला आहे.

आतापर्यंत दिशा वकानी (Disha Vakani), शैलेष लोढा, जेनिफर मिस्त्री, गुरुचरण सिंगसह काही कलाकारांनी हा शो सोडला. त्यानंतर कुश शाह हा शो सोडणार असल्याच्या बातम्या बऱ्याच दिवसांपासून येत होत्या, मात्र त्याने हे वृत्त फेटाळले होते व या फक्त अफवा असल्याचं म्हटलं होतं. पण आता स्वतः कुशनेच हा शो सोडल्याची माहिती एक व्हिडीओ शेअर करत चाहत्यांना दिली आहे.

Kapil Sharma wanted to beat KRK honey singh
“कपिल शर्मा अभिनेत्याला मारायला गेलेला, त्याच्या दुबईतील घरात काच फोडली, हनी सिंगने त्याचे केस ओढले”
micro retierment
‘मायक्रो-रिटायरमेंट’ म्हणजे काय? तरुणांमध्ये का वाढतोय हा ट्रेंड?
satya movie rerelease
‘मुंबई का किंग कौन?…’, २६ वर्षांनी मनोज बाजपेयी यांचा ‘हा’ सिनेमा पुन्हा होणार प्रदर्शित
pushpa 2 song controversy
चेंगराचेंगरीनंतर ‘पुष्पा २’बद्दल नवा वाद, निर्मात्यांना युट्युबवरून हटवावं लागलं ‘हे’ लोकप्रिय गाणं; कारण काय?
prathamesh parab regret for not getting enough screens
“महाराष्ट्रात स्क्रिन्स मिळत नाहीयेत यापेक्षा दुर्दैव…”, प्रथमेश परबने व्यक्त केली खंत; म्हणाला, “मायबाप प्रेक्षकांपर्यंत…”
Paaru
Video: “मी तुझ्याशिवाय आता श्वासही…”, आदित्यने पारूसमोर दिली प्रेमाची कबुली? प्रोमोवर प्रसाद जवादेच्या पत्नीच्या कमेंटने वेधले लक्ष
Vanita Kharat
“कॉपी करताना…”, ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम वनिता खरात म्हणाली, “हिंमत तर एवढी…”
Manoj Jarange On Devendra Fadnavis
Manoj Jarange : “आता खरी मजा, हिशेब चुकता करण्याची…”, मनोज जरांगेंचा सरकारला इशारा, तर फडणवीसांनीही दिलं प्रत्युत्तर

‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम पृथ्वीक प्रतापने घेतली पहिली गाडी! सोबतीला होते आई अन् कुटुंबीय; म्हणाला, “संयमाची चार चाके…”

कुशने मानले निर्मात्यांचे आभार

व्हिडीओमध्ये कुश म्हणतो, “जेव्हा हा शो सुरू झाला, तेव्हा तुम्ही आणि मी पहिल्यांदा भेटलो होतो, मी खूप लहान होतो. तेव्हापासून तुम्ही मला खूप प्रेम दिले. तुम्ही मला जेवढे प्रेम दिले आहे तेवढेच प्रेम या कुटुंबाने मला दिले आहे. माझ्या इथे खूप आठवणी आहेत. इथे काम करताना खूप मजा आली. मी माझे बालपण इथे घालवले आहे. मी तारक मेहता का उल्टा चष्माचे निर्माते असित कुमार मोदी यांचे आभार मानू इच्छितो. त्यांनी माझ्यावर खूप विश्वास दाखवला, माझे पात्र खूप मनोरंजक बनवले आणि मला नेहमीच प्रेरित केले. त्यांच्या विश्वासामुळेच कुश ‘गोली’ बनू शकला.”

goli aka kush shah left tmkoc
‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ टीमबरोबर कुश शाह

Bigg Boss Marathi : नवीन होस्ट असणार रितेश देशमुख! ५ वा सीझन केव्हा सुरू होणार व कुठे पाहता येणार? जाणून घ्या सर्वकाही…

शोच्या टीमबरोबर केक कापतानाचे कुशचे (Kush Shah Farewell Video) व्हिडीओ व फोटोही समोर आले आहेत. ज्यामध्ये तो असित मोदींना केकही भरवताना दिसत आहे. यावेळी कुशचे असित मोदींनी कौतुक केलं. कुश लहानपणापासूनच गोकुलधाम सोसायटीचा एक भाग आहे आणि त्याने त्याचे पात्र खूप चांगले वठवले आहे. हे ऐकून कुश भावुक झाला.

TRPच्या शर्यतीत ‘हे’ ठरले टॉप ५ कार्यक्रम! ‘झी मराठी’ वाहिनीची ‘लाखात एक आमचा दादा’ मालिका आहे ‘या’ स्थानावर, जाणून घ्या…

कुश चाहत्यांना म्हणाला…

“मी या शोला निरोप देतोय मात्र तुमचे प्रेम कायम आठवणीत राहील. पण हो, फक्त मी, कुश शाह या शोचा निरोप घेत आहे. तुमचा गोली तसाच राहील. तोच आनंद, तेच हास्य व तीच मस्ती. या शोमध्ये अभिनेता बदलू शकतो, पण पात्र नाही,” असं कुश चाहत्यांना म्हणाला.

Story img Loader