अभिनेता गोविंदाने आजवर बॉलिवूला अनेक सुपरहिट चित्रपट दिले. त्याच्या अभिनयाचे, हटके स्टाइलचे, डान्सचे लाखो चाहते आहेत. गोविंदाचे चित्रपट आजही प्रेक्षक आवडीने पाहतात. गोविंदा त्याच्या कामामुळे नेहमीच चर्चेत राहिला आहे. पण त्याचबरोबरीने त्याचं खासगी आयुष्य कोणापासून लपून राहिलेलं नाही. तो एक परफेक्ट फॅमिली मॅन आहे. गोविंदा आपल्या पत्नीवर असलेलं प्रेम अगदी खुलेपणाने व्यक्त करताना दिसतो. गोविंदाचा त्याच्या पत्नीसह असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

गोविंदाने आतापर्यंत काही रिअॅलिटी शोमध्ये पत्नी सुनीता यांच्याबरोबर हजेरी लावली. आता सोनी टीव्ही वाहिनीवरील ‘इंडियन आयडल १३’ या शोमध्येही गोंविदा त्याच्या पत्नीसह उपस्थित राहणार आहे. तसेच यावेळी त्यांची मुलगी टीनाही त्यांच्याबरोबर असेल. यादरम्यानचा गोविंदा व त्याच्या पत्नीचा एक व्हिडीओ सोनी टीव्हीने त्यांच्या युट्युब चॅनलद्वारे शेअर केला आहे.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा – गोविंदाला आवडायच्या रेखा; डेटवर न्यायची इच्छा व्यक्त करत म्हणाला होता….

या व्हिडीओमध्ये गोविंदा पत्नीसह एका गाण्यावर परफॉर्मन्स करताना दिसत आहे. यादरम्यान सुनीता गोविंदाला इशारा करतात आणि म्हणतात, “यांनी आजपर्यंत माझ्याबरोबर कधीच डान्स केला नाही.” यानंतर कार्यक्रमामध्ये उपस्थित मंडळींनी आग्रह केल्यानंतर गोविंदा पत्नीबरोबर डान्स करायला सुरुवात करतो.

आणखी वाचा – Video : ‘तू तेव्हा तशी’ मालिकेच्या ‘त्या’ सीनदरम्यान एक चूक घडली अन्…; व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

डान्स झाल्यानंतर गोविंदा हसत पत्नीला मिठी मारतो आणि तिला किस करतो. गोविंदा जेव्हा आपल्या पत्नीला किस करते तेव्हा नेहा अगदी हसू लागते. तसेच त्यांची लेक टीना वडील आईला किस करत आहेत हे पाहून चेहऱ्यावर हात ठेवत चेहरा लपवते. या व्हिडीओला नेटकऱ्यांचाही उत्तम प्रतिसाद मिळत आहे.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Govinda kissed her wife sunita on stage indian idol 13 video goes viral on social media see details kmd