बॉलीवूड अभिनेता गोविंदाची भाची व लोकप्रिय अभिनेत्री आरती सिंह लग्नबंधनात अडकली आहे. आरतीने गुरुवारी (२५ एप्रिल) मुंबईत बिझनेसमन दिपक चौहानशी लग्न केलं. त्यांच्या लग्नाचे फोटो व व्हिडीओ समोर आले आहेत. या फोटोंमध्ये आरती व दिपक खूप छान दिसत आहेत.
लग्नात आरतीने लाल रंगाचा लेहेंगा परिधान केला होता. सुंदर ज्वेलरी घालून तिने तिचा लूक पूर्ण केला. तर दिपकने नक्षीदार काम केलेली पांढरी शेरवानी घातली होती. आरती व दिपकचा वेडिंग लूक चर्चेत आहे. या जोडप्याचे लग्नाचे व्हिडीओ व्हायरल झाल्यावर चाहते त्यांना सहजीवनासाठी शुभेच्छा देत आहेत.
आरतीच्या लग्नात कलाकारांची मांदियाळी पाहायला मिळाली. बिपाशा बासूने पती करण ग्रोव्हरसह लग्नाला हजेरी लावली.
अभिनेत्री देवोलीना भट्टाचार्जी पती शानवाजसह लग्नाला पोहोचली होती.
कपिल शर्मा, अर्चना पूरण सिंह व राजीव ठाकूर यांनीही आरतीच्या लग्नाला हजेरी लावली.
आरती सिंहच्या लग्नात तिचा भाऊ व सुप्रसिद्ध कॉमेडियन कृष्णा अभिषेक व त्याची पत्नी कश्मीरा शाह दादा-वहिनीच्या जबाबदाऱ्या पार पाडताना दिसले. या लग्नाला आरती सिंहचे मामा गोविंदाही आले होते.