टीव्ही अभिनेत्री सौम्या सेठ बऱ्याच काळापासून अभिनयापासून दूर आहे. एकेकाळी मालिकेची मुख्य नायिका असलेली ही अभिनेत्री आता अमेरिकेत राहत आहे. ‘नव्या – नये धडकन नये सवाल’ या मालिकेद्वारे आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणारी सौम्या बॉलिवूड अभिनेता गोविंदाची भाची आहे. यशाच्या शिखरावर असताना तिने लग्नाचा निर्णय घेतला आणि तिचे करिअर संपले. इतकंच नव्हे तर तिचं लग्नही फार काळ टिकलं नाही, ती गरोदर असतानाच तिचा घटस्फोट झाला होता. आता जवळपास पाच वर्षांनी तिने दुसरं लग्न केलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

हेही वाचा – चार वर्षात मोडला प्रेम विवाह, घटस्फोटानंतर होती नैराश्यात, आता अभिनेत्रीला ३७ व्या वर्षी करायचंय दुसरं लग्न; म्हणाली…

सौम्याने २०१५ मध्ये अरुण कुमारशी अमेरिकेत लग्न केलं होतं. पण तिला कौटुंबिक हिंसाचार व मानसिक त्रास सहन करावा लागला. २०१७ मध्ये गरोदर असतानाच तिने घटस्फोट घेतला. आयुष्यात घडलेल्या या घटनांमुळे सौम्याच्या मनात आत्महत्येचे विचार येत होते. पण तिला तिच्या आई-वडिलांनी सांभाळलं आणि त्यातून बाहेर पडण्यास मदत केली. आता सौम्याने शुभम चुहाडियाशी दुसऱ्यांदा लग्नगाठ बांधली आहे.

हेही वाचा – सहा वर्षांचा संसार मोडला, कुशा कपिलाने केली घटस्फोटाची घोषणा; म्हणाली, “नात्याचा शेवट…”

२२ जून रोजी सौम्याने तिच्या कुटुंबीयांच्या उपस्थितीत शुभमशी ख्रिश्चन पद्धतीने लग्न केले. “आम्ही आमच्या पालकांना २१ जूनचा एक दिवस दिला होता, त्या दिवशी आमची हळद व मेहंदी कार्यक्रम पार पडला आणि दुसऱ्या दिवशी २२ जूनला आम्ही आमच्या पद्धतीने लग्न केलं. आमच्या लग्नात कोणी पाहुणे नव्हते. आमच्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाचे लोक जसे की आमच्या कुटुंबातील सदस्य आणि फक्त काही मित्रांना आम्ही आमच्या लग्नासाठी आमंत्रित केलं होतं,” असं सौम्याने तिच्या इन्स्टाग्राम पोस्टमध्ये म्हटलंय.

कोण आहे शुभम चुहाडिया?

शुभम हा चित्तोडगडचा रहिवासी आहे. तो आर्किटेक्ट आणि डिझायनर असून अमेरिकेत राहतो. करोना काळात त्यांची भेट आली व ते एकमेकांच्या जवळ आले. दोघेही जवळपास ३-४ वर्षांपासून एकमेकांना डेट करत होते, आता त्यांनी लग्नगाठ बांधली. दरम्यान, कामाबद्दल बोलायचं झाल्यास सौम्याने स्वतःचा रिअल इस्टेट बिझनेस सुरू केला आहे.