सध्या सर्वत्र आनंदाचा आणि उत्साहाचं वातावरण आहे. सगळ्यांनी मोठा जल्लोषात २०२३ चं स्वागत केलं. मनोरंजन क्षेत्रातील कलाकारांनी विविध समारंभांमध्ये, पार्टीमध्ये सहभागी होऊन २०२२ ला निरोप दिला. पण आता व्हायरल होत असलेल्या एका व्हिडीओमुळे अभिनेता गुरमीत चौधरी आणि देबिना बॅनर्जी चर्चेत आले आहेत. चाहत्यांच्या धक्काबुक्कीपासून देबिनाला वाचवताना गुरमीतला दुखापत झाली आहे.
गुरमीत चौधरी आणि देबिना बॅनर्जी हे छोट्या पडद्यावरील अत्यंत लोकप्रिय कपल. ही दोघं ३१ डिसेंबर रोजी एका कार्यक्रमात सहभागी झाली होती. यावेळी त्यांनी त्या कार्यक्रमात नृत्य सादरीकरणही केलं. पण या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी गुरमीत आणि देबिना पोहोचताच उपस्थित जमावाने त्यांना चारही बाजूंनी घेरलं.
आणखी वाचा : महाराष्ट्राला ‘वेड’ लावण्यात रितेश-जिनिलीया यशस्वी, दोन दिवसांत चित्रपटाने कमावला ‘इतक्या’ कोटींचा गल्ला
या दरम्यानचा त्यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. गुरमीत आणि देबिना येताच त्यांच्या चाहत्यांनी सेल्फी घेण्यासाठी त्यांच्या भोवती घोळका केला. त्यांच्याभोवती जमा झालेल्या लोकांची गर्दी इतकी वाढली ती नंतर त्या लोकांमध्ये धक्काबुक्की होऊ लागली. यावेळी देबिनाच्या सुरक्षेसाठी गुरमीत पुढे आला आणि त्या जमावापासून तिला रक्षण केलं. पण हे करताना त्याच्या पायाला दुखापत झाली आहे. पण काळजी करण्यासारखं कारण नाही, ही दुखापत अगदी छोटीशी आहे.
दुखापत झाल्यानंतरही गुरमीत शांतपणे वावरत होता, त्याने त्या चाहत्यांबद्दल कोणताही राग व्यक्त केला नाही. त्याच्या या कृत्यामुळे आता सगळीकडे त्याचं कौतुक होत आहे.