Gurucharan Singh Taarak Mehta Ka Ooltah Chashmah replacement: ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ ही विनोदी मालिका १६ वर्षांपासून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. अभिनेता गुरुचरण सिंग या मालिकेचा पहिल्या भागापासून एक भाग होता. त्याने २००८ ते २०१२ ही चार वर्षे रोशन सिंग सोढीची भूमिका केली होती. पण, २०१२ मध्ये कराराबद्दल पुन्हा चर्चा करण्याचा प्रयत्न सुरू असताना कोणतीही कल्पनान न देता रिप्लेस करण्यात आलं होतं, असा दावा गुरुचरणने केला आहे.

मालिकेच्या एपिसोडमध्ये सोढीच्या भूमिकेत एका नवीन अभिनेत्याला पाहिलं, तेव्हा याबद्दल कळालं होतं. मालिकेतून न कळवता काढण्यात आल्याने धक्का बसला होता, असं गुरूचरण सिद्धार्थ कन्ननला दिलेल्या मुलाखतीत म्हणाला. “तारक मेहताची टीम माझ्या कुटुंबासारखी आहे, कारण जर मी टीमला कुटुंब मानले नसते, तर मी त्यांच्याबद्दल बऱ्याच गोष्टी बोललो असतो, ज्या मी नाही बोललो. २०१२ मध्ये त्यांनी मला रिप्लेस केलं होतं, मी शो सोडला नव्हता,” असं गुरुचरणने नमूद केलं.

Tharla Tar Mag Fame Actors Dance Video
“मुझको क्या हुआ है…”, ‘ठरलं तर मग’ फेम चैतन्य अन् कुसुमचा शाहरुख खानच्या गाण्यावर जबरदस्त डान्स! कमेंट्सचा पाऊस…
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
Hrishikesh Shelar
‘तुला शिकवीन चांगलाच धडा’मधील अशिक्षित अधिपतीचं खऱ्या आयुष्यात किती शिक्षण झालंय माहितेय का?
tharla tar mag taking leap or not netizens asked jui gadkari
‘ठरलं तर मग’ मालिकेत लीप येणार का? जुई गडकरीचं सगळ्या चर्चांवर स्पष्टीकरण; म्हणाली, “कृपया…”
Marathi Actress Tejashri Pradhan exit from Premachi goshta marathi serial
तेजश्री प्रधानची ‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेतून एक्झिट! आता मुक्ताच्या भूमिकेत झळकणार ‘ही’ अभिनेत्री
Lakhat Ek Aamcha Dada
Video : “मैदानच मोकळं…”, सूर्याची बहीण संकटात सापडणार; प्रोमो पाहिल्यानंतर नेटकरी म्हणाले, “चुकीचा संदेश…”
Bhushan Prabhan
“कलाकार म्हणून आपण एकमेकांचा आदर करणं शिकलो नाही”, भूषण प्रधानकडून खंत व्यक्त; म्हणाला…
Tharla Tar Mag New Year Promo
ठरलं तर मग : सासरेबुवांचं मन जिंकण्याचा अर्जुनचा निर्धार! मधुभाऊंना शब्द देत म्हणाला, “तोपर्यंत माझ्या मिसेस सायलींची…”

“माझ्यावर १.२ कोटींचे कर्ज…”, अभिनेता गुरुचरण सिंग आर्थिक अडचणीत; ३४ दिवसांपासून अन्न नाही, कामही मिळेना

घरी मालिका बघताना नवीन सोढीची एंट्री पाहिली अन्…

“त्यावेळी करार आणि अॅग्रीमेंटबद्दल काहीतरी चर्चा सुरू होती. मला रिप्लेस करणार आहेत, असं काहीच त्यांनी मला सांगितलं नाही. मी दिल्लीत होतो आणि मी माझ्या कुटुंबियांबरोबर बसलो होतो, आम्ही तारक मेहता पाहत होतो. त्या एपिसोडमध्ये धरम पाजी चित्रपटाच्या प्रमोशनसाठी आले होते, त्यांचा एक कॅमिओ होता. मी म्हणालो, ‘व्वा, धरम पाजी आले आहेत’ आणि त्या एपिसोडमध्ये त्यांनी नवीन सोढीची ओळख करून दिली. ते पाहून मला धक्काच बसला. मी माझ्या आई-वडिलांसह मालिका पाहत होतो आणि त्यांनाही धक्का बसला होता,” असं गुरुचरण म्हणाला.

तृप्ती डिमरीचा सुपरफ्लॉप चित्रपट सहा वर्षांनी पुन्हा प्रदर्शित, दोन दिवसांत कमावले…

गुरुचरणला प्रेक्षकांचे आलेले अनुभव

मालिकेत नवीन सोढी आल्यावर प्रेक्षकांनी त्याला स्वीकारलं नाही, असं गुरुचरणने सांगितलं. “मला रिप्लेस केल्यावर निर्मात्यांवर खूप दबाव होता. मलाही काही अनुभव आले होते. मी जेव्हा जिममध्ये जायचो तेव्हा लोक म्हणायचे, ‘तू का मालिका सोडलीस? ही काही मस्करी नाही तू मालिकेत पुन्हा काम करायला पाहिजे’ असं ते रागाने म्हणायचे. तुम्ही तुमच्या घरातील सदस्यांना जसे टोमणे मारता तसे लोक मला टोमणे मारायचे. ‘मालिकेत दिसण्याचा निर्णय मी नाही घेऊ शकत तर ते बॉस घेतात’, असं मी त्यांना म्हणायचो,” असं गुरुचरण म्हणाला.

१० वर्षांपूर्वी केलं लग्न, पण प्रसिद्ध अभिनेत्रीला होत नाहीये बाळ; म्हणाली, “माझ्या आणि परागच्या वयात खूप…”

गुरुचरण म्हणाला की शोमध्ये त्यांच्या पत्नीची भूमिका करणाऱ्या जेनिफर मिस्त्रीलाही अशाच पद्धतीने रिप्लेस करण्यात आलं होतं. २०१२ मध्ये निर्मात्यांनी शोमधून काढलं, त्यानंतर वर्षभराने त्याला पुन्हा घेण्यात आलं आणि तो २०२० पर्यंत मालिकेचा भाग होता. आता मुंबईत काम शोधत असल्याचं गुरुचरणने सांगितलं.

Story img Loader