प्रसिद्ध अभिनेत्री हंसिका मोटवानी हिच्या भावाच्या वैवाहिक आयुष्यात वादळ आलं आहे. हंसिकाच्या वहिनीने पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीत हंसिका, तिची आई व भाऊ या तिघांची नावं आहे. हंसिकाची वहिनी ही टीव्ही अभिनेत्री आहे. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून तपास सुरू आहे.

हंसिकाच्या भावाचे नाव प्रशांत मोटवानी आहे. तर तिच्या वहिनीचे नाव मुस्कान नॅन्सी जेम्स असे आहे. मुस्कान ही टीव्ही अभिनेत्री आहे. मुस्कान व प्रशांत यांनी २०२१ मध्ये लग्न केलं होतं. ई-टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार, मुस्कानने पती प्रशांत, तिची सासू मोटवानी आणि नणंद हंसिका यांच्याविरोधात पोलिसात तक्रार दाखल केली आहे. भारतीय न्याय संहितेच्या कलम ४९८-अ, ३२३, ५०४, ५०६आणि ३४ अंतर्गत अंबोली पोलीस ठाण्यात १८ डिसेंबर रोजी तक्रार नोंदवण्यात आली आहे.

Rohit Roy recalls surprising daughter Kiara
अमेरिकेत शिकतेय प्रसिद्ध अभिनेत्याची एकुलती एक लेक; म्हणाला, “मी २० तास प्रवास करून गेलो अन् ती…”
Walmik Karad Surrender Case
वाल्मिक कराड ज्या गाडीतून शरण आला त्या गाडीच्या…
Amruta Deshmukh
अमृता देशमुखने वहिनी कृतिका देवबरोबर शेअर केला व्हिडीओ; पती प्रसाद जवादे कमेंट करत म्हणाला…
Akshaya Hindalkar
दीड वर्ष चालता येत नव्हतं, हातातली मालिका गेली अन्…; ‘पुन्हा कर्तव्य आहे’ फेम अभिनेत्रीचा झालेला अपघात, म्हणाली…
sana khan welcomes second baby boy
धर्मासाठी बॉलीवूड सोडणारी सना खान दुसऱ्यांदा झाली आई, दीड वर्षांचा आहे पहिला मुलगा
Maharashtrachi Hasya Jatra Fame Actor wedding
‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मध्ये झळकलेल्या अभिनेत्याने बांधली लग्नगाठ! पत्नी सुध्दा आहे अभिनेत्री, ‘या’ लोकप्रिय मालिकेत केलंय काम
Bollywood Actress parineeti chopra Life Story
९ फ्लॉप चित्रपट, तरीही नाकारला ९०० कोटी कमावणारा बॉलीवूड सिनेमा; नेत्याशी लग्न केलं अन्…; कोण आहे ही अभिनेत्री?
suriya move to mumbai with wife jyothika and children
‘हा’ साऊथ सुपरस्टार पत्नी अन् मुलांसह मुंबईत झाला स्थायिक; म्हणाला, “या शहरातील शांती आणि…”

हेही वाचा – ९ फ्लॉप चित्रपट, तरीही नाकारला ९०० कोटी कमावणारा बॉलीवूड सिनेमा; नेत्याशी लग्न केलं अन्…; कोण आहे ही अभिनेत्री?

एफआयआरनुसार, मुस्कानने आरोप केला आहे की तिची सासू आणि नणंदेने तिच्या संसारात खूप हस्तक्षेप केला आणि त्यामुळे तिचे पतीसोबतचे संबंध ताणले गेले. तिने या तिघांवर महागड्या भेटवस्तू आणि पैशांची मागणी केल्याचा आरोप केला. तसेच मालमत्तेशी संबंधित फसवणूक केल्याचंही तिने म्हटलं आहे. घरगुती हिंसाचारामुळे तणावात राहू लागल्याने बेल्स पाल्सी नावाचा आजार झाला, असंही मुस्कानने म्हटलं आहे. मुस्कान व प्रशांत दोन वर्षांपासून वेगळे राहत आहेत.

हेही वाचा – शक्ती कपूर यांनी ‘या’ अभिनेत्रीला घर घेण्यासाठी देऊ केलेली मदत; खुलासा करत म्हणाली, “त्या काळी ५० हजार रुपये…”

hansika motwani
हंसिका मोटवानी तिचा भाऊ व आई. (फोटो इन्स्टाग्राम)

ई-टाइम्सने संपर्क साधला असता मुस्कान म्हणाली, “होय. प्रशांत, हंसिका आणि ज्योती मोटवानी यांच्या विरोधात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. मी आता कायदेशीर मदत घेतली आहे. आता मी यापेक्षा जास्त या विषयावर बोलू शकत नाही.” यासंदर्भात हंसिकाने कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. तर, तिचा भाऊ प्रशांत म्हणाला, “मी देशाबाहेर आहे आणि तुम्ही कशाबद्दल बोलत आहात हे मला माहीत नाही.”

हेही वाचा – Video: पती अभिषेक बच्चन अन् लेकीबरोबर मुंबईत परतली ऐश्वर्या राय; मराठीत म्हणाली असं काही की…, पाहा व्हिडीओ

प्रशांतने डिसेंबर २०२० मध्ये मुस्कानला प्रपोज केलं होतं. त्यानंतर दोघांनी मार्च २०२१ मध्ये लग्न केलं होतं. मुस्कान ही ‘माता की चौकी’, ‘भारत का वीर पुत्र महाराणा प्रताप’ आणि ‘थोडी खुशी थोडे गम’ या मालिकांसाठी ओळखली जाते.

Story img Loader