मराठी चित्रपटसृष्टीमध्ये आदेश बांदेकर यांचं नाव आदराने घेतलं जातं. कलाक्षेत्राबरोबरच ते राजकीय क्षेत्रातही सक्रिय आहेत. गेल्या कित्येक वर्षांपासून ते झी मराठी वाहिनीवरील ‘होम मिनिस्टर’ या कार्यक्रमाचं सुत्रसंचालन करत आहेत. आज आदेश बांदेकर यांचा वाढदिवस आहे. त्यांच्या वाढदिवसानिमित्त मुलगा सोहम बांदेकरने खास पोस्ट शेअर केली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आणखी वाचा – कोट्यवधी रुपयांच्या कमाईनंतर ‘वेड’चा दुसरा भाग येणार? रितेश देशमुख म्हणाला, “चित्रपटाचा…”

आदेश बांदेकर यांच्या वाढदिवसानिमित्त चाहते त्यांना सोशल मीडियाच्या माध्यमातून शुभेच्छा देत आहेत. तसेच आज ते त्यांचा खास दिवस सेलिब्रेट करत आहेत. दरम्यान सोहमने त्याच्या वडिलांचा अगदी जुना फोटो सोशल मीडियाच्या माध्यमातून शेअर केला आहे. तसेच बाबांविषयी खास संदेशही लिहिला आहे.

सोहम फोटो पोस्ट करत म्हणाला, “वाढदिवसाच्या शुभेच्छा बाबा. तुला कधी कधी वाटत असेल की, मी लहान होतो तेव्हा बरा होतो. म्हणून लहानपणीचा फोटोही टाकला आहे.” सोहमने त्याच्या वडिलांबरोबरचा आताचा तसेच अगदी जुना फोटो इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे शेअर केला आहे.

आणखी वाचा – Video : पाठ दाबली, अंगावर बसली अन्…; प्रार्थना बेहरेचा नवऱ्याबरोबरचा बेडरुम व्हिडीओ व्हायरल, सहकलाकार म्हणाली, “दाखवायचे दात…”

ही पोस्ट पाहून कलाक्षेत्रातील अनेक मंडळींनी आदेश बांदेकर यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. सोहमही वडिलांच्या पावलांवर पाऊल ठेवत आहे. तो कलाक्षेत्रामध्ये कार्यरत आहे, तसेच अभिनेता म्हणून सोहम काम करतो.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Happy birthday aadesh bandekar his son share special post and old photo on instagram see details kmd