हार्दिक जोशी व अक्षया देवधर त्यांचं नवविवाहित आयुष्य सध्या एण्जॉय करताना दिसत आहेत. लग्नानंतर दोघांनीही नाशिकला जात सप्तश्रृंगी देवीचं दर्शन घेतलं. त्यानंतर हार्दिकच्या घरीही अक्षयाचं जोरदार स्वागत झालं. दोघंही सध्या सुखी वैवाहिक आयुष्य जगत आहेत. आता हार्दिकने त्याच्या हनिमूनबाबत भाष्य केलं आहे.
आणखी वाचा – “आयुष्य बदललं कारण…” लग्नानंतर राणादा कसं जीवन जगतो? घरातून बाहेर पडताना बायकोला व्हिडीओ कॉल केला अन्…
हार्दिकने लग्नानंतर पहिल्यांदाच झी टॉकिजच्या ‘महाराष्ट्राचा फेवरेट कोण? २०२२’च्या नामांकन सोहळ्याला हजेरी लावली. यावेळी त्याने पिवळ्या रंगाचं टी-शर्ट व जीन्स परिधान केली होती. दरम्यान ‘इट्स मज्जा डॉट कॉम’ला दिलेल्या मुलाखतीमध्ये त्याने त्याच्या वैवाहिक आयुष्याबाबत भाष्य केलं.
हार्दिकला त्याच्या हनिमूनबाबत यावेळी विचारण्यात आलं. तेव्हा अगदी खुलेपणाने हार्दिकने याचं उत्तर दिलं. हार्दिक म्हणाला, “अक्षयाच्या इन्स्टाग्राम स्टोरीद्वारे तुम्हाला याची माहिती मिळेल. पण अजूनही आम्ही काही ठरवलेलं नाही. सध्या कामही सुरू आहे. कामाकडे अधिक लक्ष देणारा मी मुलगा आहे.”
आणखी वाचा – ‘बेशरम रंग’ गाण्यासाठी दीपिका पदुकोणने परिधान केली एवढी महाग बिकिनी, किंमत आहे तब्बल…
“सध्या अक्षया म्हणाली आहे ठिक आहे तू काम कर. जेव्हा तुला वेळ असेल तेव्हा आपण कुठेतरी जाऊ. त्यामुळे जसं आम्ही दोघं लंडनला चित्रीकरणासाठी गेलो होतो तसं तुम्हाला आता आम्ही फिरतानाचाही व्हिडीओ मिळेल.” म्हणजेच सध्या हार्दिक व अक्षया त्यांच्या कामामध्ये व्यग्र असल्याचं दिसत आहे.