‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेमुळे नावारुपाला आलेली जोडी म्हणजे अक्षय देवधर व हार्दिक जोशी. त्यांनी या मालिकेमध्ये साकारलेलं राणादा आणि पाठकबाई हे पात्र तर आजही प्रेक्षकांच्या लक्षात आलं आहे. शुक्रवारी (२ डिसेंबरला) या दोघांचा विवाह सोहळा संपन्न होणार आहे. आता या दोघांच्या हळदी कार्यक्रमाला सुरुवात झाली आहे. यादरम्यानचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आणखी वाचा – Video : नखांवरच कोरली लग्नाची तारीख अन्…; राणादाच्या पाठकबाईंचा लग्नापूर्वीचा हा व्हिडीओ पाहिलात का?

अक्षया व हार्दिक त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटद्वारे लग्न तयारीचे बरेच फोटो व व्हिडीओ शेअर करत आहेत. आता अक्षया व तिच्या वडिलांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये लेक व वडिलांमधील प्रेम दिसून येत आहे.

लेक सासरी जाणार म्हटल्यावर अक्षयाच्या वडिलांना अश्रू अनावर झाले आहेत. व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये अक्षयाचे वडील रडताना दिसत आहेत. तर बाबांना पाहून अक्षयालाही अश्रू अनावर होतात. अक्षया बाबांना मिठी मारुन रडू लागते.

पाहा व्हिडीओ –

आणखी वाचा – Akshaya Hardeek Wedding : राणादाला लागली हळद, पाठकबाईंच्या हातावर सजली मेहंदी, होणाऱ्या नवरीचा उत्साह एकदा पाहाच

हा भावनिक क्षण पाहून अक्षयाचे चाहतेही भावूक झाले आहेत. प्रत्येक मुलीसाठी आई-बाबांना सोडून सासरी जाणं हा खूप अवघड क्षण असतो. अक्षयालाही त्याचा आता अनुभव येत आहे. या व्हिडीओमध्ये अक्षयाने पांढऱ्या रंगाचा ड्रेस घातलेला दिसत आहे तर तिच्या वडिलांनी सदरा घातला आहे. अक्षयाचं तिच्या वडिलांवर असणारं प्रेम व्हायरल व्हिडीओमधून दिसून येत आहे.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Hardeek joshi akshaya deodhar wedding actress gets emotional and her father cry watch video kmd