Akshaya Deodhar – Hardeek Joshi Marriage: ‘तुझ्यात जीव रंगला’ मालिकेतून घराघरात पोहोचलेली लोकप्रिय जोडी हार्दिक जोशी-अक्षया देवधर आज(२ डिसेंबर) विवाहबंधनात अडकले. कुटुंबीय, मित्रपरिवार व नातेवाईंकांच्या उपस्थितीत अक्षया-हार्दिकचं लग्न थाटामाटात पार पडलं. दोघांच्या लग्नाचे बरेच फोटो व व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
आणखी वाचा – Video : “प्रेमात पडले कोल्हापूरच्या पाहून शाही थाट…” लाजत मुरडत पाठकबाईंचा राणादासाठी खास उखाणा
दरम्यान अक्षया व हार्दिकच्या एका व्हिडीओने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. दोघांनीही नव्या आयुष्याला सुरुवात केली आहे. लग्नविधी पार पडल्यानंतर हार्दिकने खूश होत अक्षयाला भर मंडपात किस केलं. आता अक्षयानेही हार्दिकवर असणारं प्रेम व्यक्त केलं आहे.
अक्षया व हार्दिकचे लग्न विधी पूर्ण झाल्यानंतर दोघांनाही एकमेकांना हार घालायचे होते. दरम्यान अक्षयाने हार घालण्यापूर्वीच हार्दिकच्या मित्र-मंडळींनी त्याला खांद्यावर उचलून घेतलं. तरीही अक्षया उडी मारुन हार्दिकला हार घालत होती. पण हार्दिकला खांद्यावर उचलून घेतलं म्हटल्यावर मुलीकडची मंडळीही काही शांत बसली नाहीत.
अक्षयालाही काही मंडळींनी उचलून घेतलं. तिने त्यानंतर लगेचच हार्दिकला हार घातला आणि नाकावर किस केलं. त्यांचा हा क्युट व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे. शिवाय दोघांच्या जोडीला चाहतेही भरभरून प्रेम देत आहेत.