‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेमुळे नावारुपाला आलेली जोडी म्हणजे अक्षय देवधर व हार्दिक जोशी. त्यांनी या मालिकेमध्ये साकारलेलं राणादा आणि पाठकबाई हे पात्र तर आजही प्रेक्षकांच्या लक्षात आलं आहे. शुक्रवारी (२ डिसेंबरला) या दोघांचा विवाह सोहळा संपन्न होणार आहे. आता या दोघांच्या हळदी कार्यक्रमाला सुरुवात झाली आहे. यादरम्यानचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
पुण्यामध्ये अक्षया व हार्दिकचा लग्नसोहळा पार पडेल. शिवाय पुण्यामध्येच या दोघांचा हळदी समारंभ सुरू आहे. दोघांनीही या खास क्षणी पांढऱ्या रंगाचे कपडे परिधान केले आहेत. अक्षयाने पांढऱ्या रंगाचा ड्रेस तर हार्दिकने त्याच रंगाचा कुर्ता घातला आहे.
अक्षया व हार्दिकने त्यांच्या हळदी कार्यक्रमासाठी मनसोक्त खर्च केला असल्याचं व्हायरल व्हिडीओमध्ये दिसून येत आहे. बँड बाजासह अक्षया व हार्दिकची एन्ट्रीही व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे. तसेच एका मोकळ्या जागेमध्ये फुलांची सजावट करण्यात आली आहे.
पाहा व्हिडीओ –
शिवाय अक्षया व हार्दिकला बसण्यासाठी खास आसन तयार करण्यात आलं. शिवाय पाहुण्यांनीही त्यांच्या हळदी कार्यक्रमाला गर्दी केली आहे. अभिनेत्री विना जगतापसह काही कलाकार मंडळींनीही अक्षया व हार्दिकच्या हळदी कार्यक्रमाला हजेरी लावली आहे.