‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेमुळे हार्दिक जोशी व अक्षया देवधर ही जोडी नावारुपाला आली. राणादा व पाठकबाई या त्यांच्या पात्राने तर प्रेक्षकांना अक्षरशः वेड लावलं. या दोघांची ऑनस्क्रीन केमिस्ट्री तर चर्चेचा विषय ठरली. पण खऱ्या आयुष्यातही हार्दिक व अक्षया यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. लवकरच हे दोघं विवाहबंधनात अडकणार आहेत. आता या दोघांच्या लग्न विधींना सुरुवात झाली आहे.

गेल्या काही दिवसांपासून हार्दिक व अक्षयाच्या लग्नाची जोरदार चर्चा सुरु आहे. दोघंही आपल्या सोशल मीडिया अकाऊंटद्वारे केळवणाचे फोटोही शेअर करताना दिसतात. आता अक्षयाने इन्स्टाग्राम स्टोरीद्वारे काही फोटो शेअर केले आहेत.

ladies group dance on Hoti Hai Peelings Hoti Hai Feelings song video goes viral on social media
“होती है फीलिंग्स होती है फीलिंग्स” म्हणत चाळीतल्या महिलांचा तुफान डान्स; VIDEO पाहून तुम्हीही कराल कौतुक
nana patekar reacts on allu arjun arrest
अल्लू अर्जुनच्या अटक प्रकरणावर नाना पाटेकर म्हणाले, “कोणाला…
article for husband and wife to maintaining healthy relationships
समुपदेशन : तुमचं ‘रॉटन रिलेशनशिप’ नाही ना?
Bharat Gogawale, Bharat Gogawale minister desire,
भरत गोगावले यांची मंत्रिपदाची इच्छा यंदा तरी पूर्ण होणार का ?
an old lady amazing dance in grand daughters wedding
आज्जी असायला नशीब लागतं! नातीच्या लग्नात आज्जीने केला भन्नाट डान्स, VIDEO एकदा पाहाच
Mangal Vakri 2025
मंगळ देणार पैसा, प्रेम अन् प्रसिद्धी; नव्या वर्षाच्या सुरूवातीला ‘या’ तीन राशींना मिळणार प्रत्येक कामात यश
Lagnanantar Hoilach Prem New Promo
लग्नानंतर होईलच प्रेम : ‘या’ तामिळ मालिकेचा रिमेक, मृणालचं कमबॅक अन्…; पाहा जबरदस्त नवीन प्रोमो
a husband expressing love for his wife in front of family
असा नवरा भेटायला नशीब लागतं! कुटुंबासमोर व्यक्त केलं बायकोवरचं प्रेम, पाहा Viral Video

अक्षयाने शेअर केलेल्या फोटोंमध्ये तिच्या लग्नाविधींना सुरुवात झाली असल्याचं दिसत आहे. अक्षयाची ग्रहमख ही लग्नाच्या आधीची विधी सुरू आहे. या विधीदरम्यान तिने मुंडावळ्या बांधल्या असल्याचं दिसत आहेत. तसेच अक्षयाने भडक लाल रंगाची साडी परिधान केली आहे. अक्षयाने शेअर केलेल्या फोटोंमध्ये तिच्या कुटुंबातील काही मंडळी दिसत आहे.

आणखी वाचा – “विक्रम गोखले व माझे वडील भाऊ नव्हते आणि…” चुकीची माहिती पसरवणाऱ्यांवर सखी गोखले संतापली

लग्न विधींना सुरुवात झाल्यानंतर अक्षयाच्या चेहऱ्यावरील आनंद फोटोंमध्ये स्पष्ट दिसून येत आहे. हार्दिक व अक्षया १ किंवा २ डिसेंबरदरम्यान लग्न करणार असल्याचं बोललं जात आहे. पुण्यामध्ये यांचा विवाहसोहळा पार पडणार असल्याची चर्चा आहे. या दोघांच्या विवाहसोहळ्यासाठी त्यांचे चाहतेही उत्सुक आहेत.

Story img Loader