Hardeek Joshi Birthday Post : ‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेमुळे राणादा आणि पाठकबाई यांची जोडी घराघरांत लोकप्रिय झाली. या मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेऊन आता जवळपास ३ वर्षे उलटली आहेत मात्र, आजही प्रेक्षकांच्या मनात या मालिकेच्या आठवणी ताज्या आहेत. यामध्ये हार्दिक जोशीने ‘राणादा’ तर, अक्षयाने ‘पाठकबाई’ हे पात्र साकारलं होतं. ही मालिका संपल्यावर काही महिन्यांनी हार्दिक-अक्षयाने सोशल मीडियावर साखरपुड्याचे फोटो शेअर करत त्यांच्या तमाम चाहत्यांना सुखद धक्का दिला होता.
हार्दिक-अक्षयाचा ( Hardeek Joshi ) विवाहसोहळा डिसेंबर २०२२ मध्ये पुण्यात थाटामाटात पार पडला होता. आज लाडक्या नवऱ्याच्या वाढदिवसानिमित्त अक्षयाने खास पोस्ट शेअर केली आहे. अभिनेत्रीने पतीबरोबरचे रोमँटिक फोटो सोशल मीडियावर शेअर करत खास पोस्ट लिहिली आहे. अक्षयाने शेअर केलेल्या फोटोंमध्ये दोघंही वेस्टर्न लूकमध्ये पाहायला मिळत आहेत.
लग्नाआधी हार्दिकने थेट अक्षयाच्या घरी जाऊन तिच्या आई-वडिलांसमोर लग्नाची मागणी घातली होती. “मला तुमच्या मुलीशी लग्न करायचंय” असं अभिनेत्याने त्याच्या सासू-सासऱ्यांना सांगितलं होतं. यानंतर साखरपुड्यात हार्दिकने अक्षयाला प्रपोज केलं होतं.
अक्षयाची नवऱ्यासाठी खास पोस्ट
अक्षया नवऱ्याला शुभेच्छा देताना लिहिते, “वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा नवरोबा! माझ्या चेहऱ्यावरच्या गोड हास्याचं तू सर्वात मोठं कारण आहेस. आय लव्ह यू सो मच…माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे. देव तुझ्या सदैव पाठिशी आहे.” या सुंदर अशा कॅप्शनसह अभिनेत्रीने यात लव्ह इमोजी देखील जोडले आहेत.
हेही वाचा : Bigg Boss Marathi – “मला तू आवडतोस, आता फक्त…”, निक्कीने अरबाजला मिठी मारून केलं किस; भावना व्यक्त करत म्हणाली…
हार्दिकने ( Hardeek Joshi ) बायकोच्या पोस्टवर खास कमेंट केली आहे. “लव्ह यू माय वर्ल्ड” असं त्याने या पोस्टवर प्रतिक्रिया देत लिहिलं आहे. याशिवाय नेटकऱ्यांनी या फोटोंवर कौतुकाचा वर्षाव करत हार्दिकला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.