हार्दिक जोशी सध्या ‘झी मराठी’वरील ‘जाऊ बाई गावात’ या रिअ‍ॅलिटी शोमुळे चांगलाच चर्चेत आहे. मकरसंक्रातीनिमित्त होणाऱ्या विशेष भागात खास हार्दिकची पत्नी अक्षया देवधर हजेरी लावणार आहे. पारंपरिक लूक व काळी पैठणी साडी नेसून अभिनेत्री शोमध्ये उपस्थित राहणार आहे. हार्दिक-अक्षयाचा चाहता वर्ग खूप मोठा आहे. ‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेमुळे ही जोडी घराघरांत लोकप्रिय आहे. ‘जाऊ बाई गावात’ या कार्यक्रमातील स्पर्धकांनी या जोडप्याला वैयक्तिक आयुष्यातील काही प्रश्न विचारले.

शोमधील स्पर्धकांनी सगळ्यात आधी कोणी कोणाला प्रपोज केलं? असा प्रश्न हार्दिक-अक्षयाला विचारला. यावर अभिनेता म्हणाला, “माझ्या आईने एकदा अक्षयाला विचारलं होतं की, “तू मला खूप आवडतेस. माझ्या मुलाशी लग्न करशील का?” आणि ही गोष्ट मला दोन वर्षांनंतर समजली. मालिका संपल्यावर माझी आई खूप मागे लागली होती. अरे तिला एकदा तरी विचार…पण, मी म्हटलं जेवढं आता ती माझ्याशी बोलतेय तेवढंही बोलणार नाही. ते सुद्धा बंद करेल.”

Germanys Warren Buffett Karl Hellerding
जर्मनीचा वॉरेन बफे : कार्ल हेलरडिंग
16 November Aries To Pisces Horoscope Today in Marathi
१६ नोव्हेंबर पंचांग: कृतिका नक्षत्रात मेषला शुभ दिवस,…
hemal ingle bridal to be party
Video : ‘नवरा माझा नवसाचा २’ फेम अभिनेत्री लवकरच अडकणार विवाहबंधनात, मैत्रिणींसह केली Bride To Be पार्टी
Garlic Rate, Vegetable Rate, Pune, Garlic,
लसूण महागला, परराज्यातील लसणाची आवक कमी
Vivah muhurat 2025 Marriage Dates in 2025 Hindu Panchang
Vivah Muhurat 2025 : नवीन वर्ष २०२५ मध्ये विवाहासाठी किती शुभ मुहूर्त, पाहा जानेवारी ते डिसेंबरपर्यंतच्या तारखांची यादी
saif ali khan threat inter religion marriage
आंतरधर्मीय विवाहामुळे सैफ अली खानला मिळाल्या होत्या धमक्या; स्वतः खुलासा करत म्हणालेला, “आमच्या घराजवळ…”
Tharala Tar Mag New Promo
ठरलं तर मग : बाप-लेकीची भेट! अर्जुनने निभावलं जावयाचं कर्तव्य, मधुभाऊंना पाहताच सायलीला अश्रू अनावर, पाहा प्रोमो
Viral video of disabled swiggy delivery boy doing food delivery by riding a cycle
परिश्रमाशिवाय पर्याय नाही! दिव्यांग असूनही करतोय फूड डिलिव्हरी, VIDEO पाहून वाटेल अभिमान

हेही वाचा : “मला माझ्या आडनावाचा काहीच फायदा झाला नाही”, हृदयनाथ मंगेशकर यांच्या मुलीचे विधान; म्हणाल्या, “माझ्या बाबांनी…”

हार्दिक पुढे म्हणाला, “आईशी बोलणं झाल्यावर मी थेट अक्षयाच्या घरी गेलो होतो आणि तिच्या आई-बाबांना सांगितलं. मला तुमच्या मुलीशी लग्न करायचंय. अशाप्रकारे सगळं जुळून आलं. त्यानंतर आमच्या साखरपुड्यात मी अक्षयाला पहिल्यांदा प्रपोज केलं होतं.”

हेही वाचा : “माझे वडील कट्टर काँग्रेसवादी होते आणि मी…”, नाना पाटेकरांनी राजकारणाबद्दल मांडलं स्पष्ट मत; म्हणाले, “आता भाजपा…”

प्रेक्षकांच्या लाडक्या राणादाने यानंतर ‘जाऊ बाई गावात’च्या रंगमंचावर पाठकबाईंना पुन्हा एकदा गुडघ्यावर बसून प्रपोज केलं. दरम्यान, हार्दिक आणि अक्षयाने ‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेत एकत्र काम केलं होतं. मालिकेतील राणादा आणि पाठकबाईंच्या जोडीला प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला होता. मालिका संपल्यावर काही महिन्यांनी दोघांनीही गुपचूप साखरपुडा उरकत सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला.