सध्या अनेक नामवंत मंडळी शिंदे फडणवीस गटात प्रवेश करत आहेत. काल अजित पवार यांनी काही समर्थक आमदारांच्या साथीने शिंदे फडणवीस गटाशी हातमिळवणी केली आणि उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. तर आज काही मराठी कलाकारांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिंदे गटात प्रवेश केला आहे.

आज ठाण्यात आनंदाश्रम येथे एक कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थित होते. शिव चित्रपटसेनेच्या लोगोचं अनावरण करण्यात आलं. त्यावेळी हार्दिक जोशी, अदिती सारंगधर, माधव देवचके या कलाकारांनी शिंदे गटामध्ये प्रवेश केला. आता हार्दिक जोशीने ‘लोकसत्ता’शी बोलताना त्याच्या या निर्णयामागचं कारण सांगितलं आहे.

Will Ramdas Athawale take care of BJP or Republican workers
रामदास आठवले भाजपला सांभाळणार की रिपब्लिकन कार्यकर्त्यांना?
16 November Aries To Pisces Horoscope Today in Marathi
१६ नोव्हेंबर पंचांग: कृतिका नक्षत्रात मेषला शुभ दिवस,…
ajay devgan
“तो कारमध्ये एक हॉकी स्टिक…”, रोहित शेट्टीने अजय देवगणबाबत केला खुलासा; अभिनेता म्हणाला, “आता मी…”
What Sarangi Mahajan Said?
Sarangi Mahajan : “प्रवीण महाजन यांना गोपीनाथ मुंडेंनी पिस्तुल घेऊन दिलं होतं, पूनमला..”, सारंगी महाजन यांचा दावा
mallikarjun kharge replied pm narendra
“पंतप्रधान मोदी म्हणजे ‘झुटों के सरदार’, त्यांनी हेच लाल संविधान…”; ‘त्या’ टीकेला मल्लिकार्जून खरगेंचं प्रत्युत्तर!
sushma andhare
Sushma Andhare: ‘केलंय काम भारी’वरून अंधारेंचा हल्लाबोल, अंबरनाथच्या सभेत आमदार किणीकरांसह शिंदे गटातील गटबाजीवरही बोट
four pistols seized pune
पुणे: विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सराइतांकडून चार पिस्तुले जप्त, पोलिसांकडून तिघे अटकेत
present of MP Shrikant Shinde to promote Sulabha Gaekwad print politics news
सुलभा गायकवाडांच्या प्रचारासाठी अखेर खासदार शिंदे मैदानात

आणखी वाचा : हार्दिक जोशीसह प्रसिद्ध मराठी कलाकारांचा शिंदे गटात प्रवेश

हार्दिक जोशी म्हणाला, “शिव चित्रपटसेना ही संघटना आज सुरू करण्यात आली आणि कलाकारांसाठी काम करण्यासाठी ही संघटना तयार झाली आहे. सुशांत शेलार या संघटनेचे अध्यक्ष आहेत आणि त्यांच्या मार्फत आम्ही या संघटनेत सामील झालो. प्रत्येकाला वाटत असतं की आपण ज्या क्षेत्रात काम करत आहोत त्यातील लोकांना आपण मदत केली पाहिजे. पण त्याचा मार्ग सापडत नाही. तो मार्ग आज मला मिळाला आहे असं मला वाटतं.”

हेही वाचा : अक्षया देवधरची नवी सुरुवात! पहिल्या वटपौर्णिमेचा व्हिडीओ शेअर करत चाहत्यांना दिलं ‘हे’ खास सरप्राइज

पुढे तो म्हणाला, “कोणत्याही प्रकारचं राजकारण नसणारी ही संघटना आहे. त्यामुळे आम्ही सर्व कलाकार एकत्र येऊन मनोरंजन सृष्टीतील जे संपूर्ण युनिट आहे त्यासाठी आम्ही काम करणार आहोत. आजच आम्ही याचा शुभारंभ केला. आता हळूहळू आम्ही यामार्फत योजनाही तयार करत जाऊ. कलाकारांच्या आणि मनोरंजन सृष्टीतील ज्या समस्या आहेत त्या शासनापर्यंत पोहोचवण्याचा हा योग्य मार्ग आहे असं मला वाटलं आणि म्हणूनच यात सहभागी झालो.”