‘तुझ्यात जीव रंगला’ मालिकेतून घराघरात पोहोचलेले राणादा म्हणजेच अभिनेता हार्दिक जोशी आणि अंजली म्हणजेच अभिनेत्री अक्षया देवधर हे नेहमीच चर्चेत असतात. सध्या हार्दिक ‘तुझेच मी गीत गात आहे’ या मालिकेत दिसत आहे. शिवाय त्याचा चित्रपटही प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. पण दुसऱ्याबाजूला अक्षया देवधर सध्या अभिनय क्षेत्रापासून दूर आहे. यामागचं कारण अभिनेत्याने नुकत्याच एका एंटरटेन्मेंट युट्यूब चॅनेलशी बोलताना सांगितलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

हेही वाचा – ‘आई कुठे काय करते’ फेम अभिनेत्री गेली होती आत्महत्या करायला पण…; स्वतः प्रसंग सांगत म्हणाली…

‘नमो रमो नवरात्री’ या कार्यक्रमात अभिनेता हार्दिक जोशी सहभागी झाला होता. त्यावेळी ‘कलाकृती मीडिया’ या एंटरटेन्मेंट युट्यूब चॅनेलशी बोलताना हार्दिकने अक्षया सध्या काम का करत नाही? याबाबत सांगितलं.

हार्दिक म्हणाला, “लग्नानंतर वर्षभर मी घरात नाहीये. लग्न करून पुण्यात गेल्यानंतर देवीच्या कृपेने, प्रेक्षकांच्या कृपेने, परमेश्वराच्या कृपेने मी सतत काम करतोय. ती एक स्त्री पाठिशी उभी आहे, ती समजून घेतेय आणि तिने स्वतःची कामं थांबवली आहेत. तू पहिला सेट हो, तू ये, मग मी काम करते, असं अक्षयाचं म्हणणं आहे.”

हेही वाचा – माधुरी दीक्षितच्या चित्रपटात झळकणार ‘सहकुटुंब सहपरिवार’ मालिकेतील ‘ही’ अभिनेत्री

दरम्यान, हार्दिकच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर, तो ‘तुझेच मी गीत गात आहे’ या लोकप्रिय मालिकेत ‘शुभंकर ठाकूर’ या भूमिकेत पाहायला मिळत आहे. तसंच त्याचा पहिला चित्रपट ‘क्लब ५२’ १५ डिसेंबरला प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.